जालना (वृत्तसंस्था) ऐन दिवाळीत जालन्यामध्ये विजेचा शॉक लागून तीन सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यात पिंपळगाव पिंपळे येथे घडली आहे.
या घटनेमध्ये ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव (वय-२७ वर्षे), रामेश्वर आप्पासाहेब जाधव (वय- २४ वर्षे) आणि सुनिल आप्पासाहेब जाधव वय (वय२१) अशी मयत भावांची नावं आहे. तिघे भाऊ शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेले होते. शेतात जाताच पाणी सोडण्यासाठी तिघे विहिरीवर विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले असता शॉक लागला. यावेळी एकमेकांची मदत करण्यात तिघांचाही मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शेतामध्ये तिघा भावांना शॉक लागताच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेईपर्यंत तिघांचाशी मृत्यू झालेला होता. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून तिघा भावंडांचं मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणात कुटुंबीय आणि स्थानिकांचीही चौकशी करत आहेत.