नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बंगळुरुमध्ये (Bengaluru) मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहनं पाण्याखाली गेली आहेत. तर पुरामुळे बंगळुरु आणि आजुबाजुच्या परिसरातलं जनजीवनही विस्कळीत झालं आहे.
हवामान खात्याकडून बंगळुरुला पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आसाममध्ये आधीच पुरामुळे भयंकर स्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकजे कर्नाटकमध्ये देखील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे वाहनं पाण्याखाली गेली आहेत. तर बंगळुरुत एक बस पुराच्या पाण्यात अडकल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. या पुरामुळे जनजीवनही विस्कळीत झालं आहे.
दरम्यान, वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी कडक ऊन पडत आहे तर कधी पावसाची चिन्ह दिलसत आहेत. अशातच बेंगलोरमध्ये मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर भारतात आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पुराने कहर केला आहे. आता कर्नाटकातील बंगळुरुमध्येही तीच स्थिती आहे. काही तासांच्या पावसानंतर येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रहिवासी भागात पाणी तुंबले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोकांची घरे जलमय झाली आहेत. तसेच काही ठिकाणी स्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी असल्याचे चित्र दिसत आहे.