धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका रुग्णाच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. या मदतीसाठी रुग्णाच्या परिवाराने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री सहायता निधीमधून धरणगावातील दिलीपसिंग शालीकग्रामसिंग जनकवार यांना हृदयविकार आहे. जनकवार यांच्या हृद्यरोगावर उपचारासाठी एक लाख रुपयाची आर्थिक मदत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यासाठी नामदार गुलाबराव पाटील व जि.प. सदस्य प्रतापभाऊ पाटील यांचे सहकार्य लाभले. जनकवार परिवाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,नामदार गुलाबरावजी पाटील, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे आभार मानले आहेत. तर मदत मिळण्यासाठी कागदपत्राचा पाठपुरावा करण्यात माजी गटनेते पप्पू भावे, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, वाल्मिक पाटील, विलास महाजन, पवन महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मदत केली.