मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईच्या विक्रोळी येथील सर्व्हिस रोडवर दोन तरुणींनी मिळून एका तरुणीला प्रचंड चोप दिल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर मुलींच्या फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ”तो माझा बॉयफ्रेंड होता. माझं त्याच्यासोबत सुरु होतं. तर तू का मध्ये पडलीस?” असा सवाल करत या दोन तरुणी दुसऱ्या तरुणीला प्रचंड मारहाण करताना दिसत आहे.
विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती मार्गावरील सर्व्हिस रोडवर तीन तरुणींचा फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विक्रोळीच्या सर्व्हिस रोडवर नेहमीच संध्याकाळच्या वेळेस प्रेमी युगुलांचा राबता असतो. अशात विक्रोळीतच राहणाऱ्या एका तरुणीने तिच्या मैत्रिणीसोबत येऊन तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरणाऱ्या मुलीला त्याठिकाणी गाठलं. तेथे त्या मुलीला बॉय फ्रेंडसोबत का फिरतेस अशी विचारणा करत फिल्मी स्टाईल बेदम मारहाण केली. संबंधित घटना बुधवारी दुपारी घडली. दोन तरुणींनी एका मुलीला अक्षरशः रस्त्यावर लोळवून तिला बेदम मारहाण केली. अखेर त्यांच्याच मैत्रिणींनी मध्यस्थी करुन तिची या दोन तरुणींकडून सुटका केली. मात्र, तिथे प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेल्या काही तरुणांनी ही मारहाण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. नंतर काल हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि लगेच व्हायरल झाला.
नेमकं प्रकरण काय ?
रोडवर तीन तरुणींचा फ्री-स्टाईल फिल्मी हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विक्रोळीच्या सर्व्हिस रोडवर नेहमीच संध्याकाळच्या वेळेस प्रेमी युगुल असतात. एका तरुणीने तिच्या मैत्रिणीसोबत येऊन तिच्या मित्रांसोबत फिरणाऱ्या मुलीला त्याठिकाणी पकडले. तिला माझ्या बॉयफ्रेंडसोबत तू का फिरतेस? अशी रागात विचारणा केली आणि तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.