अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून उज्जैनकर फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक ,सामाजिक,
साहित्य, सांस्कृतिक, कला क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे डॉ शिवचरण उज्जैनकर यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर सरांच्या माहितीनुसार नुकताच जळगांव येथे महाराष्ट्र पत्रकार संघाचे
राज्य कार्यकारणी सदस्य ईश्वर महाजन व मान्यवरांनी केला.
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य कार्यकारिणीचे सदस्य तथा ओबीसी विद्यार्थी पालक असोसिएशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष पत्रकार श्री ईश्वर महाजन यांनी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा त्यांच्या विविध कार्याबद्दल शाल, सन्मानपत्र व गुलाब बुके देऊन नुकताच गौरव केला याप्रसंगी माजी शिक्षणाधिकारी तथा कवी शशिकांत हिंगोनेकर जि. प. जळगावचे प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी तथा ग.स.संचालक श्री विजय पवार साहेब व फाउंडेशनचे तसेच दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्था जळगावचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्री नंदलाल बोलाणे सर जळगाव जिल्हा दक्षता समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अजय पाटील सर जिल्हा सचिव प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया सर जिल्हा समन्वयक श्री एम. आर. चौधरी सर जिल्हा महिला संपर्कप्रमुख श्रीमती ज्योतीताई राणे मॅडम जिल्हा सल्लागार श्री मधुकर पोतदार जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर पाटील सर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार श्री ईश्वर महाजन सर जिल्हा विधी सल्लागार अँड नयना झोपे मॅडम सौ. तडवी मॅडम प्रा. शितल पाटील संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील रवींद्र जितेंद्र पाटील किशोर नेवे , ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हा संघटक प्रभाकर विंचुरकर,
व सर्व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी या मानपत्राचे सन्मानपत्राचे वाचन उज्जैनकर फाउंडेशन चे जळगाव जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष डॉ.अजय पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष किशोर पाटील यांनी व प्रस्ताविक जिल्हा सचिव डॉ.राजकुमार कांकरिया यांनी केले तर शेवटी आभार जळगाव जिल्हा दक्षता समितीच्या महिला संपर्कप्रमुख ज्योतीताई राणे यांनी केले.















