धरणगाव (प्रतिनिधी) : येथील एकशे आठ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तर पी.आर.हायस्कूलच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि नगरपालिका प्रशासनातर्फे आयोजित विविध स्पर्धा तथा कार्यक्रमात उत्तम कामगिरी केल्याबद्दल स्मृती चिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी पी.आर.हायस्कूल सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित ७५ फुट लांबीच्या तिरंगा राष्ट्रध्वज रॅली आणि ‘नमन करो इस मिट्टी को’ या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला म्हणून शाळेचा डाॅ. अरूण कुलकर्णी व डॉ.मिलिंद डहाळे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी हा सत्कार स्वीकारला. तहसील कार्यालय आणि पंचायत समिती आयोजित वक्तृत्व स्पर्धेत उज्ज्वल गुलाब लांबोळे तर निबंध स्पर्धेत पुष्पा सुधाकर महाजन हे विद्यार्थी प्रथम आल्याबद्दल आणि एनसीसी मध्ये उत्कृष्ट परेड केल्याबद्दल तेजस सुदर्शन ठाकुर,सागर संतोष जाधव, यशोदा गणेशसिंह चव्हाण आणि कृष्णाली अरविंद शिंदे या कॅडेटसचा तहसीलदार श्री.नितिनकुमार देवरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
नगरपालिकेच्या ७५ फुटी तिरंगा ध्वजाला एनसीसी पथकाकडून मानवंदना देऊन उत्तम परेड केल्याबद्दल एनसीसी मेजर श्री.डी.एस.पाटील आणि उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याबद्दल शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.गणेशसिंह सूर्यवंशी, डॉ.वैशाली गालापुरे आणि श्रीमती सुरेखा तावडे यांचा मुख्याधिकारी श्री.जनार्दन देवरे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.दि.१३ते १७ ऑगस्ट पर्यंत नगरपालिकेच्या सर्व कार्यक्रमांचे उत्तम सूत्रसंचालन केल्याबद्दल शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. मनोज परदेशी यांचा मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या सर्व कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापिका डॉ.आशा शिरसाठ, पर्यवेक्षक श्री.कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक श्री.बी.डी.शिरसाठ, श्री.उमाकांत बोरसे, श्री.संजय मोरे, श्री.एस.के.बेलदार, श्री.आर.एल.पाटील, श्री.आर.जी.खैरे,श्री.पी.डी.माळी,श्रीमती वंदना सोनवणे श्री.जी.पी.चौधरी, क्रीडा शिक्षक श्री.वाय.ए.पाटील,श्री.डी.एच.कोळी आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.