राशिभविष्य, सोमवार १४ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?
मेष राशी :-
मनावर नियंत्रण ठेवा. कायदेशीर अडचणी दूर होतील. जोडीदाराचे प्रेम मिळेल. शुभ रंग – किरमिजी
वृषभ राशी :-
व्यवहार लाभदायक ठरतील. मन प्रसन्न राहील. उत्पन्न वाढेल. शुभ रंग – निळा
मिथुन राशी :-
बाहेर जाण्याचा योग येईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. रागावर नियंत्रण मिळेल. शुभ रंग – पोपटी
कर्क राशी :-
घरात आणि कामाच्या ठिकाणीही तणाव असेल. उत्पन्न स्थिर राहील. धोका पत्करणे टाळा. शुभ रंग – पांढरा
सिंह राशी :-
प्रयत्नांना यश मिळेल. मन समाधानी राहील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. शुभ रंग -गुलाबी
कन्या राशी :-
शुभवार्ता मिळेल. घरात प्रसन्न वातावरण राहील. आत्मविश्वास वाढेल. शुभ रंग – मोरपिसी
तूळ राशी :-
नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. जुगार किंवा लॉटरीच्या फंदात पडू नका. काही अपेक्षित कार्यात विघ्न येऊ शकतात. शुभ रंग – निळा
वृश्चिक राशी :-
अतिरिक्त खर्च वाढेल. थकवा आणि चिंता वाढेल. उत्पन्न स्थिर राहील. शुभ रंग – नारिंगी
धनु राशी :-
कामाच्या ठिकाणी चिंतेचे वातावरण राहील. व्यवहार करताना काळजी घ्या. धोका पत्करण्याची वेळ येईल. शुभ रंग – पिवळा
मकर राशी :-
कामात नवीन शिकायला मिळेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता असेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. शुभ रंग – काळा
कुंभ राशी :-
धार्मिक कार्यात मन लागेल. सामाजिक कार्यात भाग घेण्याचा योग येईल. विचारपूर्वक खर्च करा. शुभ रंग – निळा
मीन राशी :-
आरोग्यावर खर्च वाढेल. व्यवसायात स्थिरता प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी सहकर्मचार्यांचे सहकार्य लाभेल. शुभ रंग – सोनेरी