राशिभविष्य, शनिवार २ जुलै २०२२ : मेष धैर्याची परीक्षा घेणार दिवस आहे. चतुर्थ चंद्र कार्यालयात काही समस्या निर्माण करेल. मातृ चिंता सतावेल. घरात जबाबदारी वाढेल.
वृषभ : आज जवळपासचे प्रवास संभवतात. काही महत्त्वाचे निर्णय होतील. प्रयत्न करा.धैर्य खचू देऊ नका. कर्क चंद्र लाभ देईल .दिवस मध् त्ययम.
मिथुन : आर्थिक लाभ झाला तरी खर्चाचे वाढते प्रमाण त्रास देईल. मंगळ अचानक आणि वेगाने घटना घडवेल. जपून रहा. गुरुबळ उत्तम आहे. दिवस शुभ.
कर्क : चंद्र शुभ आहे. पण शनी सावध वागण्याचा संकेत देत आहे. जोडीदाराची काळजी घ्या. कलह टाळा. नवीन घडामोडी होतील.
सिंह : व्यय चंद्र अधिक खर्च, दवाखान्याची फेरी असे परिणाम देईल. शुक्र जोडीदार निवडताना मदत करील. शत्रू पराजित होतील. मात्र प्रकृती जपा. दिवस मध्यम.
कन्या : मन काहीसं अस्वस्थ राहिल. जवळच्या व्यक्तीची किंवा जोडीदाराची चिंता सतावेल. घाबरू नका. थोड्या काळात सगळे ठिक होईल. संततीची काळजी घ्या.
तूळ : खूप कामाच्या बोज्याने कंटाळून जाल. कुठेतरी जवळपास जाण्याचे बेत ठरतील. आर्थिक स्थिती ठिक राहिल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटेल.
वृश्चिक : भाग्य स्थानातील चंद्र उत्कृष्ट अनुभव देईल. स्वयंपूर्ण आणि आनंदी राहाल. धार्मिक कामात रस घ्याल.तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील. प्रवास, संपर्क असा हा दिवस उत्तम जाईल.
धनु : आज दिवस सांभाळून राहण्याचा आहे. तृतीय शनी आर्थिकदृष्ट्या कठीण असून शुक्राची षष्ठ स्थानातील उपस्थिती प्रकृतीचे त्रास निर्माण करेल. काळजी घ्या. दिवस घरात शांततेत जाईल.
मकर : राशीच्या तृतीय स्थानातील गुरू आणि सप्तम चंद्र जीवनात काही घडामोडी घडवेल. धन स्थानातील शनी त्रासदायक परिणाम देईल.जोडीदार सोबत प्रवास योग येतील. दिवस मध्यम.
कुंभ : गुरू महाराज शनीवर अंकुश ठेवतील. षष्ठ चंद्र दवाखान्याची भेट होऊ शकते. आईकडील व्यक्तीशी संपर्क होईल. आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम.
मीन : आज दिवस शैक्षणिकदृष्टया उत्तम आहे. सामाजिक जीवनात यशस्वी होणार आहात. संततीची काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या ठिक आहे. दिवस उत्तम. शुभम भवत