TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी शिवसेना सज्ज : गुलाबराव वाघ

धरणगावात शिवसेनेची बैठक उत्साहात ; आगामी निवडणुकांसाठी फुंकले रणशिंग !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 17, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला आहे. आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. धरणगाव येथील शिंपी समाज मंगल कार्यालयात येथील आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

 

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

याप्रसंगी गुलाबराव वाघ यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने मागील कालखंडात विविध शेतकऱ्यांचा योजना व पक्षप्रमुख तथा महाराष्ट्रचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. ज्यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान केलं ते गुलाबराव पाटील यांची बंडखोरी, हे मनाला धक्का देणारी आहे. पण शिवसैनिकांनो डगमगू नका. एक गुलाबराव फुटला, पण दुसरा गुलाबराव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. शिवसेना हे अक्षरच आपले ऊर्जा आहे. त्यातून आपले ऊर्जास्रोत निर्माण होते. आपल्या भाषणात गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेची जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यात मजबूत स्थिती असून आगामी कालखंडातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पक्षाला चांगले यश लाभणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. तसेच सेना भवनातून आलेल्या प्रतिज्ञापत्र जास्तीत जास्त पदाधिकारी यांनी भरून देण्याचे आव्हान केलं. भविष्यात गद्दारांना धडा शिकवण्यात येणार असल्याचा इशारा देखील श्री. वाघ यांनी याप्रसंगी दिला. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या बैठकीत शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, मा. नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी,मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज पटेल, राजेंद्र ठाकरे, जिल्हा संघटक अँड.शरद माळी, व्यापारी सेनेचे दिनेश येवले, अल्पसंख्याक आघाडीचे वसीम पिजारी यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, शहरातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य, शिवसेना, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी फिरोज पटेल यांनी आपल्या मनोगतात माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या कार्याचा लेखा जोखा मांडला आणि आम्ही खरी शिवसेना म्हणजे उध्दव साहेब आणि याच शिवसेने सोबत राहू. तसेच शिवसेनेच्या पडतीचा काळात आता साथ देण्याची वेळ आहे. हीच साथ स्व. सलीम पटेल यांना खरी आदरांजली ठरेल. तसेच सर्व मुस्लिम समाज हा शिवसेनेचा पाठीशी राहील असे मत पटेल यांनी व्यक्त केले.

शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष व उद्योगपती सुरेश नाना चौधरी यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निराधार आरोपांना तात्काळ उत्तर देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. तसेच आगामी काळात आम्ही शिवसेनाला तन-मन आणि धनाने रणनीती आखू., उद्धव साहेब जो आदेश देतील, त्याचे पालन करू. उद्धव साहेब हे एकमेव असे मुख्यमंत्री होते की, त्यांनी पदाचा राजीनामा दिला तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू होते. बंडखोरांना एवढं दिल्यावर देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वास घात केला.
खरचं हिंदुत्वसाठी बंडखोर केली असेल. तर आमदारकीचा राजीनामा द्यावा. परंतू बंडखोरांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बंडखोरी केली, असल्याचे प्रतिपादन अँड शरद माळी यांनी केले. यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी देखील भाऊक मनोगत व्यक्त केले. तसेच शिवसेनेचे बैठकीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची तयारी करून धरणगाव नगरपालिकेवर झेंडा फडकणार असे मत व्यक्त केले.

 

माजी नगरसेवक भागवत चौधरी यांनी शिवसेना ही कोणाला डगमगनारी नाही. शिवसेनेचा शिवसैनिक हा वाघ आहे. नेते फुटतात पण निष्ठावंत शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचारांवर आजही शिवसेना सोबत आहे. शिवसैनिकला लाभ नसतो. परंतू लाभ घेणारे फुटल्याची खंत त्यानी व्यक्त केली. नवनिर्वाचित विकास सोसायटीत घवघवीत यश मिळवलेले सुरेशनाना चौधरी व चेअरमन उमेश महाजन, कैलास मराठे यांचा सत्कार करण्यात आला.

 

शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी अतिशय भावपूर्ण असे भाषण केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सांगितले होते की, बंडखोर आमदारांनी माझ्या आजारपणाचा फायदा घेतला. ज्यांना वाढवलं, त्यानी धोका दिला. परंतु निष्ठावंत शिवसैनिक हे माझे कवच आहे. ते माझ्या सोबत असल्याचं उध्दव ठाकरेंनी मार्गदर्शन केले होते. यावेळी शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सोसायटीच्या चेअरमन संचालक मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी केले. तर आभार कार्यालय प्रमुख विनोद रोकडे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

लोकांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडून घेणे चुकीचे : एकनाथराव खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गतवर्षाप्रमाणेच यंदाही १०० टक्के पडणार पाऊस ; पंजाबराव डक यांचे भाकीत !

April 20, 2023

पाचोऱ्यातील बीएसएफ जवानाचे मिझोराम येथे निधन !

June 17, 2024

आधार कार्ड, पॅन कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही ; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

August 13, 2021

चाळीसगावात घरफोडी; ४ लाखांचा ऐवज लंपास

May 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group