राशिभविष्य, गुरुवार ९ जून २०२२ : कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज काही सुखद बातमी मिळू शकते. या व्यतिरिक्त आज इतर अनेक राशींना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे.
मेष : घरातील महत्त्वाच्या कामात लक्ष द्या. लव लाईफ चांगली राहील. धन आगमन होईल. आरोग्य निरोगी राहील. परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. कुटुंबात अनुकूल वातावरण असेल.
वृषभ : व्यापार आणि नोकरीतील प्रलंबित कामं पूर्ण होतील. वायफळ खर्च करणं टाळा. व्यापारात प्रगती होईल. आरोग्य निरोगी राहिल.
मिथुन : आरोग्याची काळजी घ्या. लव लाईफ उत्तम राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. भगवान श्री गणेशाची पूजा करा.
कर्क : नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठांकडून चांगलं सहकार्य मिळेल. आरोग्य निरोगी राहील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. व्यापारातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. गृहस्थजीवनात सुख – शांतता राहील.
सिंह : वायफळ खर्च करणं टाळा. समाजात मान-सन्मान मिळेल. बॅंकिंग आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे.
कन्या : राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींची भेट होईल. विवाहीत जीवनात आनंद मिळेल. मन स्थिर राहील. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. आरोग्य निरोगी राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल.
तूळ : कामाधंद्यात वाढ होईल. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. प्रेमळ व्यक्तीची भेट झाल्यामुळे, तुमचे मन प्रसन्न राहील.
वृश्चिक : आई-वडिलांकडून चांगला आशीर्वाद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. उच्चवर्गीय अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. लव लाईफ उत्तम राहील. नोकरीत पदोन्नती होईल.
धनु : नवीन कार्याची सुरूवात करू शकता. प्रलंबित कामं पूर्ण होतील. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या.
मकर : विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. मीडिया आणि आय.टी. क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : आय.टी. आणि मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी दिवस संघर्षमय असेल. तुमची प्रत्येक कामं पूर्ण होतील. लव लाईफ उत्तम राहील. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मनात चिंता सतावत राहील.
मीन : आय.टी. आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. लव लाईफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहील.
















