राशिभविष्य, बुधवार ९ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?
मेष राशी :-
बुद्धीचा वापर करणे हिताचे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस. प्रगती होईल. शुभ रंग – गुलाबी.
वृषभ राशी :-
शब्द, पैसा आणि वेळ यांचे महत्त्व ओळखणे हिताचे. घाईपेक्षा संयम लाभदायी ठरेल. दिवस चांगला आहे. प्रगतीचा योग आहे. शुभ रंग – पांढरा.
मिथुन राशी :-
प्रामाणिकपणा, प्रसंगी सत्य गोड बोलत सांगणे, प्रयत्नांमधील सातत्य यामुळे यश लाभेल. सहकाऱ्यांची साथ लाभेल. प्रगतीचे योग आहेत. शुभ रंग – मोरपिशी.
कर्क राशी :-
हुशारीने काम करा. कधी स्पष्ट बोलावे, कधी साखरेत घोळवून सत्य सांगावे आणि कधी मौन राखावे हे जमले तर यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रगती होईल. शुभ रंग – हिरवा.
सिंह राशी :-
कायदा, नियम यांचे पालन करणे आणि वाद टाळणे हिताचे. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण खात्री करुन घेणे लाभाचे. शुभ रंग – किरमीजी.
कन्या राशी :-
कष्ट करणाऱ्याला यश मिळेल. अडचणींमधून मार्ग निघेल. कौटुंबिक सुख लाभेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागेल. शुभ रंग – पोपटी.
तूळ राशी :-
सामर्थ्य आणि क्षमता ओळखून त्यांचा पुरेपूर वापर कराल. वास्तवाचे आणि व्यावहारिकतेचे भान राखून प्रगती कराल. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. शुभ रंग – पांढरा.
वृश्चिक राशी :-
शब्द, पैसा आणि वेळ यांचे महत्त्व ओळखल्यास प्रगती होईल. वाद टाळणे आणि प्रसंगी गोड बोलून काम साधणे हिताचे. शुभ रंग – नारिंगी.
धनु राशी :-
कामावर लक्ष केंद्रीत करा. वाद टाळून प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. प्रगती होईल. शुभ रंग – पिवळा.
मकर राशी :-
ओळखी वाढवाल आणि त्यांचा व्यवस्थित वापर कराल. गोड बोलून प्रभाव पाडाल. प्रगती कराल. शुभ रंग – निळा.
कुंभ राशी :-
वाद टाळणे आणि ओळखी वाढवून स्वार्थ साधणे आज जमल्यास प्रगती होईल. गृहसौख्य लाभेल. आर्थिक प्रगती होईल. शुभ रंग – राखाडी.
मीन राशी :-
संयम आपल्यासाठी लाभदायी आहे. प्रयत्नांमधील सातत्य प्रगतीसाठी हितकारक आहे. आर्थिक प्रगती होईल. इतरांवर प्रभाव पाडाल. शुभ रंग – सोनेरी.