राशिभविष्य, बुधवार १८ मे २०२२ : आज चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत जाणार आहे. धनु राशीमध्ये चंद्राच्या संचारामुळे गजकेसरी योग तयार होईल, कारण चंद्र मीन राशीत गुरूपासून केंद्रस्थानी असेल.
मेष : आरोग्य उत्तम राहील. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
सिंह : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.
कन्या : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
धनु : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कुंभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. संततिसौख्य लाभेल.
मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.