मेष : विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. आज घरातील सदस्याची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुम्ही चिंतेत राहू शकता. एक विशेष व्यवसाय करार निश्चित केला जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि निधी वाढेल. कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे. समोरील प्रत्येक गोष्टीत रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. विषय वासना वाढू शकते. हौसेचे मोल लक्षात घ्याल.
वृषभ : दिवसाच्या दुसऱ्या भागात गोंधळात असला तरी पराक्रमात वाढ होईल. आज तुमचे लक्ष कामाच्या ठिकाणी नवीन योजनांवर असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि कुठेतरी तीर्थयात्रेला जाण्याची योजना देखील बनविली जाईल. दिवस घाईगडबडीत जाईल. खिलाडु वृत्तीने वागाल. मित्रांशी पैज लावाल. बुद्धिकौशल्याने कामे करण्याकडे कल राहील. उपासनेसाठी वेळ काढावा.
मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सकारात्मक असणार आहे. आज तुमचा संपूर्ण दिवस कलात्मक आणि सर्जनशील कार्ये पूर्ण करण्यात जाऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला साथ देतील आणि नवीन प्रकल्प सुधारण्यासाठी काही कल्पना तुमच्या मनात येतील.कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्यावे. बागबगीच्याच्या कामात गुंग व्हाल. समोरील सर्व गोष्टीत आनंद मानाल. घरगुती कामे सुरळीत पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
कर्क : आज तुमचे अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू शकता. संध्याकाळी तुम्ही मित्राच्या लग्नाला जाऊ शकता. बौद्धिक छंद जोपासाल. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. जास्त चौकसपणा दाखवाल. साहित्य प्रेम दर्शवाल. भावंडांच्या सहवासात जुन्या आठवणीत रमाल.
सिंह : आज जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल आणि कोणत्याही मालमत्तेबद्दल चर्चाही कराल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष द्यावे आणि एकाग्रता राखावी. व्यस्ततेतही तुम्हाला सोमवती अमावस्येला पूजेसाठी वेळ मिळेल, यामुळे मनाला शांती मिळेल. कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून दुरावण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. भागीदारीच्या कामात काही नवीन बदल करावेत. कचेरीच्या कामात वेळ लागू शकतो. सामाजिक संबंध जपावेत.
कन्या : नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. वाणी आणि वागण्यावर संयम ठेवा, अन्यथा कायदेशीर प्रकरणात अडकू शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने काम करत राहा. आपल्या इच्छेला अधिक महत्व द्याल. स्वत:चे म्हणणे खरे कराल. इतरांबद्दल मत बनवण्याआधी सारासार विचार करावा. घरगुती प्रसंग शांतपणे हाताळावेत. काही कामे फार कष्ट न घेता पार पडतील.
तूळ : प्रेम जीवनामध्ये तुमचा आदर वाढेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या कुटुंबाबद्दलही सांगाल. स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये काही समस्यांना सामोरे जावे लागेल. मानसिक चंचलता जाणवेल. उगाचच नसत्या काळज्या करत बसाल. ध्यानधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. हातातील अधिकाराची जाणीव ठेवावी. आर्थिक उलाढाल सावधगिरीने करावी.
वृश्चिक : प्रेम भागीदार त्यांच्या नात्याचा पुरेपूर आनंद घेतील आणि नातेसंबंध पुढे नेण्याचा विचार करतील. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल आणि मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या जीवनसाथीसोबत तुमच्या नात्यात गोडवा येईल आणि तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यावसायिक लाभ सुनिश्चित करावा. मित्रांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांना खुश करता येईल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने समाधानी राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल.
धनू : कौटुंबिक मालमत्तेतून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी आज कठोर परिश्रम करावे लागतील, तरच ते यशस्वी होतील. व्यवसायात आज काही धोका पत्करावा लागेल, तरच लाभ होण्याची शक्यता आहे. कामाची वेळेनुसार छानणी करावी लागेल. जबाबदारी लक्षात घेऊन वागावे. राग आवरता घ्यावा लागेल. कोणतेही धाडस करतांना सावधानता बाळगावी. प्रवासात काळजी घ्यावी.
मकर : आईच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला व्यवसायात कोणतीही नवीन गुंतवणूक करायची असेल तर परिस्थिती तुमच्या अनुकूल आहे. दैनंदिन घरातील कामे हाताळण्यासाठी पुरेशी संधी मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील आणि तुमचे प्रेम जीवन कायम नातेसंबंधात बदलण्याचा आजचा प्रयत्न यशस्वी होईल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. तात्विक विचार मांडाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळवाल. थोर व्यक्तींविषयी आदर व्यक्त कराल. क्षमाशीलतेने वागाल.
कुंभ : व्यापाऱ्यांच्या मेहनतीला यश येईल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. खाण्यापिण्यात जास्त बेफिकीर राहू नका, अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते. आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल आणि आशीर्वादही मिळतील. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाई करू नका. दिवसभर कामाचा ताण राहील. बौद्धिक ताण जाणवेल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. इतरांच्या मताचा विचार करावा. योग्य संधीची वाट पहावी.
मीन : जर तुम्ही व्यवसायात कोणतीही जोखीम घेतली असेल तर त्याचा परिणाम आज तुमच्या बाजूने होईल. कौटुंबिक जीवनात काही समस्या सुरू आहेत, त्या संयमाने आणि तुमच्या गोड वागण्याने दूर होऊ शकतात. बदलीची चिन्हे दिसतील. तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल. कामात उर्जितावस्था येईल. वैचारिक सुसूत्रता ठेवावी. जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल. (Today Rashi Bhavishya, 20 February 2023)