मेष : मुलांच्या भविष्यासाठी लाभदायक योजना साकार होतील. सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल. तसेच घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. काही नवीन काम सुरू होईल. पती-पत्नीमध्ये चांगला संवाद होऊ शकतो. प्रयत्नांची कास सोडू नये. मिळकत व खर्च यांचे संतुलन ठेवावे. आपली स्वप्ने पूर्णत्वास जातील. रोजगाराच्या क्षेत्रात यश मिळेल. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा.
वृषभ : नवीन कामांचे नियोजन केले जाईल आणि ते सुरू करण्यासाठी काही लोक मदत करू शकतात. यावेळी आत्मविश्लेषणाद्वारे तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. विमा आणि कमिशन संबंधित कामात अधिक यश मिळेल. लहान प्रवास संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनातील नकारात्मक विचार काढून टाका. कष्टाशिवाय काही हाती लागणार नाही. यात्रा सुखकर होईल.
मिथुन : कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मुलाच्या करिअरविषयी कोणतीही माहिती मिळाल्याने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आज कुठेही पैसे गुंतवू नका. प्रलंबित कामे मार्गी लागतील. शेजार्यांचे सहकार्य मिळेल. दिवस उत्तम फलदायी असेल. आर्थिक बाबतीचे प्रयत्न यश देतील. तज्ञ व्यक्तींची भेट होईल.
कर्क : तुम्ही तुमच्या विचार आणि बुद्धीने प्रत्येक समस्या सोडवू शकाल. संत किंवा गुरूच्या सहवासात राहिल्याने मनःशांती मिळू शकते. कार्य क्षेत्रात काम करण्याचा तुमचा उत्साह प्रचंड असेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राखाल. आहारावर नियंत्रण ठेवावे. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वरिष्ठांना नाराज करू नका. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. वाणीत माधुर्य जपावे.
सिंह : नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील. राग आणि हट्टीपणा यांसारख्या नकारात्मक गोष्टी तुमचे काम बिघडू शकतात हे लक्षात ठेवा. पती-पत्नीमध्ये काही मतभेद होऊ शकतात. कामातील समस्या दूर कराव्या लागतील. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायांना इजा संभवते. वैचारिक स्थिरता ठेवावी. आपले छंद जोपासावेत.
कन्या : आर्थिक स्थितीही मजबूत असू शकते. तुमच्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित व्हा. यावेळी चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रतिकूल परिस्थितीत जोडीदाराची पूर्ण साथ मिळू शकते. विरोधकांच्या करवायला कमी होतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात मान वाढेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल.
तूळ : आज थोडा वेळ आत्मचिंतन आणि एकांतात घालवण्याचा प्रयत्न करावा. हे तुम्हाला रोजच्या त्रासांपासून मुक्त करू शकते. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांची काळजी घेणे ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. धनलाभाचे योग संभवतात. नवीन काम सुरू करू शकता. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एखादी मौल्यवान वस्तु मिळेल. विरोधक पराभूत होतील.
वृश्चिक : आज आपल्या आर्थिक योजनेशी संबंधित कामाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. हे तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आज घराच्या देखभालीच्या कामात व्यस्त राहाल. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा.व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. कामाचा ताण जाणवेल. उगाच चिडचिड करू नये. जोखमीचे पाऊल उचलताना सारासार विचार करावा.
धनू : आपल्या बुद्धिमत्तेने आणि विवेकबुद्धीने सर्व समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळू शकतात. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. स्वत:वर जास्त कामे लादून घेऊ नका.स्पर्धेत यश मिळेल. भावंडांचे सहकार्य मोलाचे ठरेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हातातल्या कामाचा कंटाळा करू नका. मौल्यवान वस्तूंचे जतन करा.
मकर : गेल्या काही वर्षांत तुम्ही केलेल्या योजना सुरू करण्याची वेळ आली आहे. तुमच्या भावना आणि औदार्य यांचाही गैरवापर होऊ शकतो हे लक्षात ठेवा. आर्थिकदृष्ट्या थोडी अडचण येऊ शकते. कोणाशीही संपर्क प्रस्थापित करताना काळजी घ्यावी. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. समस्यांचे निराकरण होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणावरही अति विश्वास दाखवू नका.
कुंभ : कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. तुम्ही ते हाताळण्यास सक्षम व्हाल. व्यवसायातील सर्व कामे सुरळीतपणे चालू शकतात. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमचे मनोबल उंचावतील. मुलांच्या जबाबदार्या पार पाडाल. पैशाच्या बाबतीतले प्रयत्न यश देतील. थोडीशी धावपळ करावी लागेल. देवावरील श्रद्धा वाढेल. जोडीदाराच्या मदतीने अडकलेल्या गोष्टी पुढे सरकतील.
मीन : तुमच्या सभोवतालच्या सकारात्मक लोकांसोबत थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या आराम वाटेल. आज कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. बोलताना शब्द जपून वापरा. मानसिक शांतता लाभेल. प्रवास लाभदायक ठरतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील.