TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २५ जुलै २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आपण खूप हिशोबी राहाल, असे गणेशास दिसत आहे. आपल्या प्रियव्यक्तीसाठी भेट वस्तू खरेदी करण्यास पैसे खर्च करावे असे जरी आपणास वाटले तरी आपण त्यात कंजूषपणा कराल. अकारण चिंता करू नका. आत्मविश्वासाच्या जोरावर मुसंडी माराल. सकारात्मकतेची जोड घ्याल. प्रेरणा देणार्‍या घटना घडतील. कार्यालयीन सहकारी मदत करतील.

वृषभ : आपणास कायम स्वरूपात योग्य परतावा मिळू शकेल अशा किंवा मुदत ठेवीत गुंतवणूक करण्यास हि वेळ योग्य असल्याचे गणेशास वाटते. आर्थिक जोखीम घेण्याची आपली मनःस्थिती नसेल. पैसे खर्च करताना सारासार विचार करावा. चिकाटी सोडून चालणार नाही. नवीन योजना मनात रुंजी घालतील. दिवसभर उत्साह जाणवेल. गैरसमजाला मनात थारा देऊ नका.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : आज अनावश्यक गोष्टींवर आपण खर्च कराल. ह्याव्यतिरिक्त भिन्नलिंगी व्यक्ती, प्रवास, क्षणिक आनंद किंवा अनपेक्षित घटनांवर पैसा खर्च कराल.सहजीवनात आनंदाचे क्षण येतील. जोडीदाराचे नवीन रूप पहायला मिळेल. हलक्या कानाच्या लोकांपासून दूर राहावे. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. घरगुती खर्चाचे गणित मांडावे लागेल.

कर्क : आज पैसे खर्च केल्यास, त्या व्यक्तीस खूष करण्याच्या आपल्या प्रयत्नात आपण यशस्वी व्हाल. भेटवस्तूंची देवाण घेवाण करण्यास आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे. खर्च करून एखाद्याचे हृदय जिंकण्यास ग्रह अनुकूल आहेत. व्यावसायिक स्थिती तणावपूर्ण राहील. हाती मिळालेला वेळ सत्कारणी लावावा. व्यायामाला कंटाळा करू नका. कामाचा आवाका समजून घ्यावा. आपले गुपित उघडे करू नका.

सिंह : परतफेड होण्यास आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याने इतरांना पैसे देताना सावध राहण्याचे सूचन गणेशा करीत आहे. आज आपण स्वतःहूनच काहीतरी सुरु करा, जे आपणास नंतर आर्थिक दृष्टया फायदेशीर ठरू शकेल.नातेवाईकांशी जवळीक वाढेल. घरातील वातावरण चांगले राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी पार पाडाल.

कन्या : आज आपण आर्थिक बाबतीत व्यवहारी राहून एक पैसा सुद्धा विचार केल्या शिवाय खर्च न करण्याची शक्यता आहे. आपणास गुंतवणुकी संबंधी निर्णय घ्यावयाचा असल्यास, आजचा दिवस त्यास अनुकूल आहे.आर्थिक कामात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. कामातील रुचि वाढवावी लागेल. नातेवाईकांना नाराज करू नका. आवडते छंद जोपासाल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा लागेल.

तूळ : आज आपणास जे काही मिळेल त्याचा आनंद घेऊन आराम करण्याची हीच वेळ असल्याचे गणेशास वाटते. ग्रहांची अनुकूलता नसल्याने खूप मोठे लक्ष्यांक ठेवण्यास आजचा दिवस योग्य नाही. विनाकारण वाद उकरून काढू नका. मानसिक ताण नियंत्रणात ठेवा. ध्यानधारणा करावी. हिशोबात चोख रहा. वर्तन चांगले ठेवा.

वृश्चिक : आज गुंतवणुकीसाठीच खर्च कराल, आजचा खर्च वाया जाणार नाही. आपल्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक संबंधा पलीकडे जाऊन खर्च केल्यास ती आजच्या दिवसाची एक उत्तम अशी गुंतवणूक ठरेल. हातातील काम पूर्ण होईल. व्यवसायातील अनुभवी लोकांचा सल्ला घ्याल. मुलांचे वागणे स्वतंत्र वाटेल. आपल्या मनातील कल्पना आमलात आणाव्यात. जवळचा प्रवास घडेल.

धनू : आपल्या आर्थिक बाबींवर आपणास विचार करावयाचा असेल तर, आपल्या आर्थिक ताळमेळाचा आढावा घेऊन आपले कोठे चुकते ते शोधून चूक सुधारण्याची आपणास गरज भासेल, असे गणेशास वाटते. प्रयत्नातून यश मिळेल. कायदेशीर बाबी पाळाव्या लागतील. कामाची धांदल राहील. मानसिक शांतता जपावी. मेहनतीचे फळ मिळेल.

मकर : आज आपली बुद्धी शिकण्यात व ग्रहण करण्यात प्रवृत्त होईल. गुंतवणूक किंवा सट्टा ह्या संबंधी काही शिकून घेण्यास काय हरकत आहे ? विकल्प म्हणून आपण संगीत किंवा एखादी कला शिकण्यात पैसा गुंतवू शकाल. इतरांची ढवळा ढवळ सहन करावी लागेल. मनाची द्विधावस्था टाळावी. आरोग्याची वेळेवर काळजी घ्या. कामे वेळेत हातावेगळी होतील. कामातून समाधान शोधाल.

कुंभ : बाजारात नुकत्याच नव्या आलेल्या वस्तूंची खरेदी न करण्याचा इशारा गणेशा देत आहे. अशा गोष्टीत गुंतवणूक करून अल्प काळासाठी आपणास आनंद मिळू शकेल व आपणास आपला मोह ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल.प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल. भावंडांसाठी तजवीज कराल. प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. नवीन ओळखीचा फायदा होईल.

मीन : आज, आपण जवळच्या स्थळास भेट देण्याची योजना आखाल. विकल्प म्हणून दूरवरच्या सहलीस जाऊन शुद्ध हवा घेऊ शकाल. एक लक्षात ठेवा कि केलेल्या गुंतवणुकीचा परतावा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात मिळतोच. मानसिक ताण कमी करण्यासाठी वाचन करावे. व्यावसायिक गुंतवणूक जपून करावी. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. दिवस संमिश्र जाईल. तिखट पदार्थांचा आस्वाद घ्याल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

'द क्लिअर न्यूज' इफेक्ट : बातमी प्रकाशित होताच अवैध बायोडिझेलची विक्री बंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फटाके बंदी निर्णय याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

November 11, 2020

अजित पवार लवकरच मोठा धमाका करणार?, केला ‘हा’ खळबळजनक दावा

September 17, 2021

लक्ष्मीपूजनाला हिंदूबांधवांनी मशिदीत पढली नमाज : ६५ वर्षांपासूनची परंपरा !

November 5, 2021

दोन वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या इरफानची झाली ‘आत्मसन्मान’च्या माध्यमातून कुटुंबियांशी भेट !

August 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group