मेष :
व्यावहारिकदृष्टय़ा याचा विचार करा. जे काही करायचे आहे ते या दिवसांतच करावे लागेल आणि ते स्वत:लाच करायचे आहे हे मात्र लक्षात ठेवा. इतरांवर अवलंबून राहिल्यास विनाकारण व्याप वाढेल. बाकी दिवस चांगले जातील. नोकरदारवर्गाला स्वत:ची बाजू सिद्ध करण्याची ही वेळ नाही. व्यवसायात योग्य ते नियोजन केल्यास अडचण जाणवणार नाही. गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील ते न स्वीकारलेले चांगले. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा.
वृषभ :
संयम ठेवून काम केल्यास त्रास कमी होईल. त्यासाठी नियोजनाला महत्त्व द्या. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. नोकरदारवर्गाला तडजोड करावी लागणार नाही. व्यवसायात अपेक्षित असे यश मिळेल; त्यासाठी करावी लागणारी मेहनतही तेवढीच असेल. आर्थिक बाबतीत आवक चांगली राहील. सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडताना काळजी घ्यावी लागेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास आल्हाददायक वाटेल.
मिथुन :
ज्या गोष्टीतून त्रास होत आहे त्या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करा. अंदाजे कृती करणे टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. नोकरदारवर्गाला कामामध्ये उत्साह वाटेल. व्यवसायात कलाकुसरीच्या वस्तूंपासून मोठा नफा मिळेल. सामाजिक माध्यमांद्वारे केलेल्या जाहिरातीचा फायदा होईल. आर्थिक बाबतीत व्यवहार रोखठोक करा. स्वार्थी मित्रांपासून लांब राहा.
कर्क :
चांगल्या गोष्टींची सुरुवात होईल. संधीचे सोने करण्याची वेळ आता आली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अडचणींचा कालावधी कमी होईल. नोकरदारवर्गाला कामातील बदल स्वीकारावे लागतील. मात्र हे बदल त्रासाचे नसतील हे निश्चित आहे. व्यापारीवर्गाला बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादन वाढवावे लागेल. मोठी गुंतवणूक करणे आवश्यक वाटेल. या गुंतवणुकीचा लाभ होईल.
सिंह :
हा गैरसमज या दोन दिवसांत दूर करायला जाऊ नका. या दोन दिवसांचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही तुमचे मत मांडू शकता. त्यानंतरचा कालावधी चांगला असेल. नोकरदारवर्गाला कामामध्ये गती येईल. व्यवसायात धाडसी निर्णय घ्यावेसे वाटतील, मात्र ते घेताना आवक-जावक पाहा. व्यवसायातील परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला शिका. आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात संवाद साधताना शब्द जपून वापरा.
कन्या :
ज्या गोष्टीतून वाद होणार आहे अशा गोष्टींच्या मुळाशी जाऊच नका. हे दोन दिवस शांततेत पार पाडा. त्यानंतरचा कालावधी हा चांगला जाईल. नोकरदारवर्गाला नवीन काही गोष्टी शिकावयास मिळतील. व्यवसायातील स्थिरता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. स्पर्धेच्या नादी लागू नका. हिशेबाच्या नोंदी ठेवा. आर्थिकदृष्टय़ा बचत करणे महत्त्वाचे राहील. राजकीय क्षेत्रात सध्या काहीही न बोललेले चांगले. भावंडांच्या बाबतीत झालेले गैरसमज वाढवू नका. शेजाऱ्यांशी दोन हात लांब राहा. धार्मिक गोष्टींची आवड निर्माण होईल.
तूळ :
चांगल्या गोष्टींसाठी उशीर लागला तरी चालेल. त्यासाठी धीर धरा. इतरांना सल्ला देताना विचार करा. कुठेही उग्र रूप धारण करू नका. नोकरदारवर्गाने वरिष्ठांशी कामापुरता संवाद ठेवा. व्यवसायात जी आणि जशी परिस्थिती आहे ती स्वीकारा. यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करूच नका. भागीदारी व्यवसाय टाळा. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा. राजकीय क्षेत्रात चर्चासत्रात पडू नका.
वृश्चिक :
इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. आपली मते इतरांवर लादू नका. हे दोन दिवस सोडले तर बाकी दिवस चांगले जातील. नोकरदारवर्गाला आपल्या कामाची जबाबदारी इतरांवर टाकून चालणार नाही. त्यासाठी स्वत:च प्रयत्नशील राहा. आर्थिकदृष्टय़ा तोंडी व्यवहार टाळा. राजकीय क्षेत्रात मर्यादा सांभाळा. मैत्रीचे नात्यात रूपांतर होईल. मुलांसोबत करमणुकीचे बेत आखाल. जोडीदाराशी संवाद साधताना शब्द जपून वापरा. कुटुंबातील जबाबदारी पार पाडावी लागेल. उपासनेत मन रमेल.
धनू :
या दोन दिवसांत जेवढी शांत वृत्ती ठेवाल. तेवढे तुमच्यासाठी चांगलेच राहील हे विसरू नका. बाकी दिवस चांगले जातील. नोकरदारवर्गाला महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकदृष्टय़ा व्याप वाढेल. अनेक ठिकाणांहून आलेल्या संधी सोडू नका. नेहमीपेक्षा जास्त उलाढाल वाढलेली असेल. आर्थिकदृष्टय़ा व्यवहार चोख ठेवा. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. मुलांच्या बाबतीतील निर्णय उशिरा घ्या. घरगुती वातावरण चांगले राहील.
मकर :
उतरती कळा थांबणार आहे. या संधीचा फायदा घेऊन अनेक अपुऱ्या गोष्टी पूर्ण करा. नोकरदारवर्गाला मनासारखे काम मिळेल. पारंपरिक व्यवसायाचे महत्त्व वाढेल. व्यवसायातील उत्पन्नात झपाटय़ाने वाढ होईल. व्यावसायिकदृष्टय़ा व्यवस्थापन उत्तम जमेल. आर्थिक लाभ मिळेल. राजकीय क्षेत्रात पुढारकीपणा करणे टाळा. इतरांचे मार्गदर्शन घ्या. वैयक्तिक तुमचा सल्ला सांगत बसू नका. मुलांच्या हट्टापायी नको तिथे खर्च करू नका. भावंडांशी जवळीक साधाल. शेजारधर्माविषयी आपुलकी वाटेल.
कुंभ :
जिथून तुम्हाला नकार मिळत होता तिथून होकार आल्यामुळे समाधान वाटेल. कामातील उत्साह वाढेल. सकारात्मक गोष्टी घडू लागतील. नोकरदारवर्गाने वरिष्ठांशी नम्रतेने संवाद साधल्यास कामातील अडथळे दूर होतील. व्यवसायात पूर्वीसारखी तडजोड स्वीकारावी लागणार नाही. व्यावसायिक बदल चांगला राहील. फायद्याचे प्रमाण वाढलेले असेल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. राजकीय क्षेत्रात जबाबदारीचे भान ठेवा. शब्दांत अडकत बसू नका. शेजारधर्माशी जेवढय़ास तेवढे राहा. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. शारीरिक ताण कमी होईल.
मीन :
आजचे काम उद्यावर ढकलण्याचा जो अंगी आळस होता तो कमी होईल. सध्या उद्याचे काम हे आज करण्याची मानसिकता निर्माण होईल. सरळ मार्गे गोष्टी होऊ लागतील. नोकरदारवर्गाला कामाचा कंटाळा वाटणार नाही. व्यवसायात आगामी काळासाठी केलेली तरतूद फायद्याची ठरेल. उत्पन्नातील आवक-जावक वाढेल. भागीदारी व्यवसायात झालेला गैरसमज दूर होईल. सामाजिक माध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. नातेवाईकांशी हितसंबंध बिघडणार नाही याची काळजी घ्या. मुलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. अध्यात्माची आवड राहील.