TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्नेहाची शिदोरी अविरत राहणार; श्रद्धेय भवरलालजी जैन ८३ व्या जयंती दिनी अशोक जैन यांची घोषणा

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना आव्हानात्मक परिस्थितीत एप्रिलपासून भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि जैन इरिगेशन कंपनीद्वारा ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम नियमितपणे सुरू आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जळगाव शहरातील कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम अविरत सुरू ठेवणार असल्याची घोषणा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या ८३ व्या जयंतीदिनी आयोजित भक्तीसुधारस या कार्यक्रम प्रसंगी केली.

‘आपला समाज सातत्य, समर्पण आणि सेवा जोपासणाऱ्या माणसांवर उभा आहे.’ श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारांचा हा संस्कार जैन परिवारावर खोलवर रुजल्याचीच ही प्रचीती. अशोक जैन यांनी मोठ्याभाऊंच्या काही भावस्पर्शी आठवणी सांगत ही घोषणा केली. साधारणतः २०१५ मध्ये जळगाव शहरातील कोणताही नागरिक उपाशी राहू नये असे संवेदनशील विचार मोठ्याभाऊंच्या मनात सातत्याने येत होते. समाजाकडून आपण भरभरून घेत असतो, आपणही समाजासाठी कृतज्ञतापूर्वक नक्कीच काही केले पाहिजे या भावनेतून भोजनाची आवश्यकता असणाऱ्यांसाठी सकाळ-संध्याकाळ भोजन उपलब्ध करून देण्यासंदर्भात भवरलालजी जैन उर्फ मोठ्याभाऊंनी अशोक जैन यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला होता. एकूणच या संदर्भात नियोजन काय करता येईल, या संकल्पनेची अंमलबजावणी कशाप्रकारची असेल, नेमके स्वरूप निश्चित होत होते परंतु, प्रत्यक्ष ही संकल्पना सुरू करण्यात काहीना काही व्यत्यय येत राहिला. श्रद्धेय मोठ्याभाऊंचे निर्वाण होईस्तोवर ही संकल्पना प्रत्यक्ष कृतिशील न झाल्याची सल जैन परिवाराला होती. 25 फेब्रुवारी 2016 रोजी भवरलालजींनी या जगाचा निरोप घेतला. जैन परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक दलुभाऊ जैन यांनी त्यानंतरच्या प.पू. कानमुनींच्या पहिल्या चातुर्मासात भाऊंच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ जैन समाजातील बांधवांसाठी विनामूल्य भोजनालयाची व्यवस्था केली व ती सुविधा आजही सुरू आहे.

READ ALSO

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

कोविड-१९ या वैश्विक महामारीने संपूर्ण जगाला मराणाची दशा दर्शवली तशी जगण्याची दिशाही दिली. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच संवेदनशील वर्तन करून सेवाभाव जोपासला पाहिजे त्यातच आपल्या आयुष्याचे सार्थकत्व आहे या विचारांचे प्रत्यक्ष दर्शन दिसले ते ‘स्नेहाची शिदोरी’ या संकल्पनेत. लॉकडाऊन काळात अनेक प्रकारच्या गंभीर परिस्थितीला जनसामान्यांना सामोरे जावे लागले. भोजनाची आवश्यकता असणाऱ्यांना सेवाभावी वृत्तीने घासातला घास देण्याचा जैन परिवाराचा संस्कार येथेही कामी आला. कांताई सभागृहातून १ एप्रिल २०२० ते १२ डिसेंबर २०२० दरम्यान दोन वेळचे सुमारे ९ लाखाच्यावर भोजन पाकिटे देण्यात आली. स्नेहाची शिदोरी उपक्रम सुरू असताना मोठ्याभाऊंच्या कायम स्वरूपी भोजन उपलब्ध करण्याच्या संकल्पनेची जैन परिवारास सातत्याने आठवण होतीच. ‘स्नेहाची शिदोरी’ अव्याहत रहावी असे जैन परिवाराद्वारा निश्चित करण्यात आले. मोठ्याभाऊंच्या ८३व्या जन्मदिनानिमित्त ‘स्नेहाची शिदोरी’ कायम स्वरूपी राहिल ही अशोक जैन यांनी घोषणा केली. कालानुरूप या भोजनालयाबाबत योग्य ते निर्णय निश्चित घेतले जातील मात्र ही संकल्पना यापुढे निरंतर सुरू राहणार आहे ज्यामुळे शहरातील कोणतीही व्यक्ती उपाशी झोपणार नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
Next Post

विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन आजपासून; ठाकरे सरकार ६ अध्यादेश आणणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जत 29 गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये उपलब्ध : मंत्री गुलाबराव पाटील !

August 21, 2024

महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींनी नोंदणी करणे बंधनकारक

January 16, 2021

भोसरी भूखंड प्रकरणी उपनिबंधकाला जामीन ; खडसे दाम्पत्याला पीएमएलए कोर्टाचे समन्स

October 5, 2021

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group