जळगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या कुसुंबा गावात टीका दाम्पत्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची भयंकर घटना आज उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, कुसुंबा नाक्याच्या मागे एका इमारतीत पत्नी-पत्नीचा गळा आवळून असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. इमारतीच्या गच्चीवर पतीला तर किचन लगत असलेल्या एका खोलीत पत्नीचा मृतदेह आढळून आला. मुरलीधर राजाराम पाटील (वय 47), आशाबाई मुरलीधर पाटील (वय 38, (दोघे राहणार कुसुंबा स्वामी समर्थ शाळेमागे) अशी मयतांची नावे आहेत.
दरम्यान घटनास्थळी एमायडीसी पोलिसांनी धाव घेतली असून संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना रवाना झाले आहे. दरम्यान, मृत दाम्पत्याच्या मुलीने मृतदेहांची ओळख पटविली असल्याचे कळते.
खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विभागीय अधिकारी कुमार चिंथा, स्थानिक गुन्हे शाखेचे किरण बकाले यांच्यासह एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
















