चोपडा (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या वतीने विद्यापीठ क्षेत्रातील विविध पदावर उत्कृष्ठ कार्य करणाऱ्याचा सन्मान करण्यात आला. त्यात पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पंकज कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथील मुख्य लिपीक श्री सुनिल बळीराम पाटील यांना उत्कृष्ठ शिक्षकेतर कर्मचारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या विद्यापीठ क्षेत्रातील विशेष योगदानामुळे त्यांची निवड विद्यापीठ समितीने केली.
दिनांक 14 डिसेंबर रोजी विद्यापीठात माजी प्राचार्य कुलगुरू डॉ के बी पाटील यांच्या हस्ते व मा.कुलगुरू प्रा विजय ल माहेश्वरी, मा प्र कुलगुरू प्रा.सोपान इंगळे, मा.व्यवस्थापन पाणी परिषद राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ विनोद प्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सहकुटुब सन्मानित करण्यात आले सदरील पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे,संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले, भागवत भारंबे, गोकुळ भोळे, सचिव आशोक कोल्हे, प्राचार्य आर आर अत्तरदे, मुख्याध्यापक एम व्हि पाटील, विकास पाटील, प्राचार्य मिलिंद पाटील, केतन माळी, मिना माळी तसेच संस्थेतील सर्व प्राध्यापक,शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.