नागपूर (वृत्तसंस्था) बालाकोटच्या हल्ल्याची माहिती तीन दिवस आधी अर्णबला कशी मिळाली. केंद्रीय नेत्यांनाही याबाबत माहिती दिली जात नाही. मग अर्णब गोस्वामीला ही माहिती कशी मिळाली. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. तसेच याबाबत आम्ही अर्णब यांच्यावर काय कारवाई करता येईल, याबाबत लीगल ओपिनियन मागवलं आहे,’ असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
‘भारत बालाकोटवर हल्ला करणार ही माहिती अर्णब गोस्वामीला तीन दिवस आधी कशी कळाली? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न असून अंत्यत गंभीर बाब असून सीक्रेट अॅक्ट नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. ‘अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या संभाषणात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बालाकोटच्या हल्ल्याची माहिती तीन दिवस आधी अर्णबला कशी मिळाली. एखाद्या देश दुसऱ्या देशावर हल्ला करणार असेल तर त्याची माहिती संरक्षण मंत्री आणि तीन- चार महत्त्वाच्या नेत्यांना असते. केंद्रीय नेत्यांनाही याबाबत माहिती दिली जात नाही. मग अर्णब गोस्वामीला ही माहिती कशी मिळाली. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिले पाहिजे,’ अशी मागणीही अनिल देशमुख यांनी दिली आहे.
अर्णब गोस्वामी यांनी राज्यातील मोठ्या नेत्यांना अंगावर घेतले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. आता अर्णब यांच्या संभाषणाचे तपशील व्हायरल झाल्याने देशभरात खळबळ माजली आहे. अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या संभाषणात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यावरून कॉंग्रेससह विरोशी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. अर्णब यांना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जेल पर्यटन या योजनेची आज घोषणा केली आहे. २६ जानेवारी पासून येरवडा कारागृह हे पर्यटनासाठी खुले होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. तसंच, ही योजना महाराष्ट्रातील इतर कारागृहातही राबवण्यात येणार आहे. ‘शाळा, कॉलेज व शैक्षणिक अस्थापना तसंच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभागाद्वारे जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे,’ असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.