चोपडा (प्रतिनिधी) येथील आजी-माजी सैनिक सेवाभावी संस्थेच्या वतीने नुकताच २६ जुलै रोजी कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला.
यावेळेस चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक मॅडम सौ.कमलाकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करत शहिदांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले. यावेळेस संस्थेचे उपाध्यक्ष गोपाल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात क्षत्रु सैन्याने भारतीय लष्कराच्या मनोधैर्या विषयी जी काही गणित मनाशी केली होती, ती भारतीय जवानांनी चुकीची ठरविली.
पोलादी निर्धार व निधड्या छातीने भारतीय लष्कराने जोरदार प्रतिहल्ला चढवला. दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रप्रेम व अदम्य साहस हि भारतीय लष्कराची बलस्थाने आहेत. याचा परिचय देत समोर असलेला निष्ठूर क्षत्रु व अंत्यत प्रतिकूल हवामानाला तोंड देत पराक्रम गाजवला व शौर्य दाखवीले व जोरदार प्रतिहल्ला करत टायगर हिल्स सह हा प्रदेश ताब्यात घेतला, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी पोलीस निरीक्षक कमलाकर मॅडम ,रा स्व संघाचे विभाग संघचालक राजेंश आबा पाटील, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष कैलास जगताप उपाध्यक्ष गोपाळ सोनवणे सचिव संदिप बडगुजर, विठ्ठल पाटील साहेब, मनोहर पवार, सुभाष शिरसाठ धनराज मराठे यांच्यासह आजी-माजी सैनिक संस्थेचे पदाधिकारी व रा स्व संघाचे स्वयंसेवक गौरव अग्रवाल, चेतन बिऱ्हाडे, सुधाकर पाटील, रोहित माळी आदी उपस्थित होते होते.