जळगाव (प्रतिनिधी) काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत आज जोरदार गोंधळ झाल्याचे बघावयास मिळाले. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार अनिल शिंदे समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार काँग्रेसचे राज्याचे सहप्रभारी बी.एम संदीप यांच्यासमोरच झाला. बैठक सुरू झाल्याच्या नंतर काही जणांनी काँग्रेसचे सचिव संदीप यांच्याकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली.
यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी म्हटल आहे की, या बैठकीचे आपण अध्यक्ष आहोत, कोणी बोलायचे हे आपण ठरविणार असल्याचे सांगत जो आपले ऐकणार नाही त्यांना सभागृहाचा बाहेर जावे लागेल असे जाहीर केले जाईल. त्यांच्या या बोलण्यावरून सुरू झालेला वाद हा एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचला. काँग्रेसचे पराभूत उमेदवार अनिल शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवारांवर विधानसभेच्या आपल्या उमेदवारी वेळेस खूप त्रास दिल्यासह पक्षाच्या निधीतून दोन लाख रुपये आपल्याकडून घेतल्याचा गंभीर आरोप केला. वाढत चालेल्या वादावर प्रदेश सहप्रभारी बी.एस संदीप यांनी मध्यस्थी करत वाद मिटविला आणि काही वेळात बैठक गुंडाळण्यात आल्याचं पाहायला मिळाले.
अनिल शिंदे हे काँग्रेसचे कोणतेही पदाधिकारी नाहीत, त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन आम्ही चूक केली आहे. त्यांच्या वागण्यामुळे त्यांना केवळ तेरा हजार मत मिळाले आहेत. त्यांची अनामत रक्कम सुद्धा जप्त झाल्याने आमच्या आघाडीला मानहानी सहन करावी लागली आहेत. त्यांनी खोटेनाटे आरोप करावे याची त्यांना लाज वाटायला पाहिजे. त्यांच्या आरोपांचे आपण खंडण करतो, ते पुढील काळात भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर असल्याने ते मला आणि पक्षाला विविध आरोप करत बदनाम करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसू लागले असल्याचं जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटल आहे.