पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) पाळधी जिल्हा परिषद गटातील टाकळी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज पाळधी येथे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये निलेश लोटन पाटील, सुनील साहेबराव पाटील, चतुर रतीलाल पाटील, शहादू रामदास कोळी, प्रल्हाद पाटील,निखिल सदावर्ते,ज्ञानेस्वर अशोक पाटील,शरद पाटील,सुकलाल पाटील,महेश पाटील,विजय पाटील,जगन्नाथ पाटील यांचा समावेश होता. यावेळी संजय माळी( संजू महाराज), सचिन पवार, नवल पारधी,अनिल माळी,महेंद्र शिंदे,किशोर राघो पाटील,युवासेना उपतालुका प्रमुख अमोल विजय पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.