चोपड़ा (प्रतिनिधी) विश्वातील नागरिकांसाठी जितोने एक ऐतिहासिक आणि मंगलमय संधी उपलब्ध करुन दिली होती त्यानुसार दि. ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक ८:०१ वाजता, विश्वनाथ जिनिंग फैक्टरी येथे विश्व नवकार महासंमेलन दिन आयोजित केला गेला. या पवित्र आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व धर्मीय बंधू-भगिनींना सकल जैन समाजाच्या वतीने JITO व भारतीय जैन सघटनाच्या तसेच नवयुवक मंडळच्या वतीने निमंत्रण देण्यात आले होते.
‘विश्व कल्याणासाठी एकत्र येऊया आणि नवकार महामंत्राचा सामूहिक जप करून शांती आणि सद्भावनेचा संदेश देऊया !’ या उद्देशाने विश्वशांतीसाठी सामुदायिक नवकार महामंत्र जप हा दिवस केवळ चोपडावासियासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक विशेष पर्वणी पर्व होते. या दिवशी सामुदायिक नवकार महामंत्राचा जप आयोजित केला गेला विशेष म्हणजे, एकाच वेळी १०८ देशांमध्ये आणि भारतातील ६००० ठिकाणी हा शांतीमंत्र गुंजला.
या कार्यक्रमाची महती आणखी वाढवणारी बाब म्हणजे, भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे देखील ऑनलाइनच्या माध्यमातून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते.नवकार महामंत्र शांती आणि सद्भावनेचा दिव्य संदेश दिला गेला. नवकार महामंत्र, केवळ एक प्रार्थना नाही, तर तो संपूर्ण जगासाठी शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. या मंत्राच्या माध्यमातून आपण अनेक आध्यात्मिक विभूतींना वंदन करतो.
नवकार मंत्राचा अर्थ
* णमो अरिहंताणं – अर्थात, ज्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्त केले आहे, त्या अरिहंतांना आमचे नमन.
* णमो सिद्धाणं – मोक्षपदाला पोहोचलेल्या सिद्धांना आमचा प्रणाम.
* णमो आयरियाणं – धर्माचे मार्ग दाखवणारे आचार्यांना आमचे वंदन.
* णमो उवज्जायाणं – आध्यात्मिक गुरुंना आमचा नमस्कार.
* णमो लोए सव्व साहूणं या जगात असलेल्या सर्व साधू-संतांना आमचे विनम्र अभिवादन.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन सकल जैन समाज व JITO , भारतीय जैन संघटना , नवयुवक मंडळच्या वतीने चोपड्यात आयोजित करण्यात आले होते. या पवित्र कार्यात तालुक्यातील सर्व धर्मीय धर्मगुरु, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,माजी आमदार कैलाश बापु पाटिल,चोसकाचे माजी चेअरमन अड़. घनश्याम अण्णा पाटिल, महात्मा गांधी शिक्षण मंडळचे चेअरमन अड़. संदिप भैय्या पाटिल, पंकज समुहचे चेअरमन डॉ.सुरेश बोरोले, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, डॉ. अमित हरताळकर, डॉ. लोकेन्द्र महाजन, व्यापारी आशिषभाई गुजराथी, व्यापारी संतोष शेठ अग्रवाल, तसेच सर्व समाजातील, प्रमुख व्यक्ती उपस्थित होते. सकल जैन समाज व JITO चोपडयातील चेतन टाटिया,रमेश जैन, सुभाषचंद बरडिया, बाबूलाल बोथरा, मोहनलाल जैन, संजय जैन, राजेंद्र जैन, रविंद्र जैन,दर्शन देशलहरा, सौरभ जैन, विशाल जैन, राजस जैन, मयूर जैन, पवन जैन आदि समितिने आयोजन करण्यात आले होते. चोपड़ा शहरातील सर्व नागरिक या पवित्र आणि ऐतिहासिक क्षणी मोठ्या संख्येने सहभागी होते.
कार्यक्रम सांगता वेळी प्रसादीचे लाडू अनिल सुनील बुरड़ याच्याकडून ठेवण्यात आले होते.
भारतीय जैन संघटनाचे निर्मल बोरा,दर्शन देशलहरा, गौरव कोचर, मयंक बरडिया, आकाश जैन, जितेन्द्र बोथरा, दिपक राखेचा, आदेश बरडिया, प्रविण राखेचा,चेतन दर्डा, प्रेम चोपड़ा,नमन चोपड़ा,संस्कार छाजेड,आनंद आंचलिया, श्रेणिक रुणवाल, सागर जैन,भूषण सांड, समस्त सकल जैन समाजाचे नवयुवकानी कार्यक्रम यशस्विवितेसाठी मेहनत घेतली चोपड़ा शहरातील सर्व नागरिक या पवित्र आणि ऐतिहासिक क्षणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.














