धरणगाव (प्रतिनिधी) येथे श्री दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रवचन, गायन, होम हवन व भजनाच्या कार्यक्रमासह साजरी झाला.
धरणगाव येथे सालाबादाप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंती निमित्ताने दत्त मूर्तीवर अभिषेक सोहळा साजरी झाला. दिनांक 13 शुक्रवार रोजी रात्री प्रवचनाच्या कार्यक्रमाची सुरुवात व सांगता श्री धनराजनाथजी यांच्या हस्ते झाली. यावेळी गुरुची महिमा व गुरूंचे महत्त्व याबद्दल माताजी सुनंदा देवी, माताजी शकुंतला देवी, माताजी पुष्पा देवी, माताजी रजनी देवी यांनी आपल्या भक्तांना गुरु पुजनाचे महत्व सांगितले. तसेच यावेळी मंत्रोपचाराद्वारे भगवान श्री दत्तात्रयांचे मुर्तीचे अभिषेकही करण्यात आले. दिनांक 14 शनिवारी रोजी अभिषेक, पूजन व आरती करण्यात आली तर दुपारी 12 वाजेपर्यंत होम हवनाचा कार्यक्रम पार पडला.
या गुरुपौर्णिमा निमित्ताने शनिवार रोजी अन्नदानाच्या कार्यक्रम पार पडला असून या महाप्रसादाचा लाभ भक्तजनांसह सर्वांनी घेतला. या पंचक्रोशीतील कार्यक्रमाला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातून भक्तगणांनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम कांतीलाल मराठे, फकीरा मराठे, बाळू चौधरी, दिगंबर चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, शेखर जगताप, प्रकाश बडगुजर, देविदास पाटील, तुकाराम चौधरी, अशोक परदेशी, सागर परदेशी, आकाश परदेशी, संपुर्ण परदेशी परिवार व भक्त लोक यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.