पाचोरा (प्रतिनिधी) पत्नीसह दोघांनी पतीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. तसेच वडीलांचा विश्वास घात करुन १ लाख रुपये घेऊन तसेच पत्नीने सोन्याचे दागिन्यांसह साड्या, मोबाईल फोन चोरी केला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पप्पू भाऊसाहेब पाटील (वय २५, रा. गिरणा पंपिंग रोड, लक्ष्मीनगर, पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २२ एप्रिल २०२२ रोजी पप्पू पाटील यांची पत्नी अनिता पप्पु पाटील, (रायसिंग मोजीजी पठाण रा.धामिया मध्य प्रदेश), बादशाहा रामदास पावरा (रा, बांभोरी खु// ता.जि. जळगाव ह, .मु गिरणा पंपिंग रोड ता. पाचोरा जि. जळगाव) यांनी संगणमत करुन पप्पू पाटील यांच्या वडीलांकडून 1 लाख रुपये घेऊन ते परत न करता उडवा उडवीची उत्तरे देऊन पप्पू पाटील व त्यांच्या वडीलांचा विश्वास घात करुन फसवणुक केली आहे. तसेच पप्पू पाटील यांची पत्नी हीने फिर्यादीच्या घरातुन 70 हजार घरातून रोख रुपये व लग्नात केलेले 85 हजारांचे सोन्याचे दागिने, 12 हजार किंमतीच्या साड्या व 15 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल फोन, असा मुददेमाल घरातून चोरुन घेऊन गेली आहे. यामुळे २ लाख ५२ हजारांत फसवणूक केली म्हणून पाचोरा पोलीस ठाण्यात पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकाँ विनोद पाटील हे करीत आहेत.