नागपूर (वृत्तसंस्था) गळफास लावून घेतलेला पती शेवटचे आचके देत असताना काही कळायच्या आतच पत्नीने पतीचे पाय वर उचलून धरले आणि पत्नीच्या धैर्य आणि हिमतीमुळे पतीला नवे जीवन मिळाले आहे. कोमात गेलेल्या पतीला मेडिकलमध्ये भरती केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले आणि तिसऱ्या दिवशी पतीला शुद्ध आली.
३८ वर्षीय महिलेचा पती खचून गेला होता. २५ ऑक्टोबरला त्याने पंख्याला दोरी बांधली. स्टूलवर चढून गळफास घेत स्टूल पाडला. आवाजामुळे पत्नीने डोकावून पाहिले आणि तिने लगेच पतीचे पाय धरून संपूर्ण ताकद लावून वर उचलून धरले. शेजारच्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. कोमात गेलेल्या पतीला पत्नीने त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मेडिसिन विभागाचे डॉ. अतुल राजकोडावार यांनी तातडीने उपचार सुरू केले. आयसीयूमध्ये हलवीत व्हेंटिलेटरवर ठेवले. तीन दिवसांनंतर पतीला शुद्ध आल्याचे पाहताच पत्नीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.