जळगाव (प्रतिनिधी) आजचा २ तासाचा दौरा आटोपला की झालं माझ काम … हुश्श.. केंद्र सरकार आणि देवेंद्रजी बघून घेतील…मदतीचे, अशी टीका भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या खासदार व आमदारांनी शिवसेना व त्यांच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यावर भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी खोचक टीका केली आहे.
जळगाव येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील ट्विटरवर सक्रिय असतात, त्या माध्यमातून ते विरोधी पक्षावर टीका करीत असतात. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे. ते म्हणतात की, किंबहुना आजचा २ तासाचा दौरा आटोपला की झालं माझ काम … हुश्श.. केंद्र सरकार आणि देवेंद्रजी बघून घेतील…मदतीचे.