बीड (वृत्तसंस्था) उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला गेलेल्या शिरूर तालुक्यातील गोमळवाडा येथील नऊ वर्षांच्या मुलीचा मंगळवार ६ जून रोजी दुपारी अंगणात खेळतांना गळ्याभोवती झोक्याच्या दोरीचा फास बसून मृत्यू झाला. वैष्णवी गणेश कातकडे (वय ९) असे मयत मुलीचे नाव आहे.
शिरूर तालुक्यातील गोळवाडा येथील उपसरपंच गणेश कातकडे यांची मोठी मुलगी वैष्णवी कातकडे (९) बीड तालुक्यातील मोची पिंपळगाव येथे मामाच्या गावाला उन्हाळ्याच्या सुट्टीत गेली होती. मंगळवार ६ जुन रोजी दुपारी तीन वाजता ती अंगणामध्ये बांधलेल्या झोक्यावर खेळत असतांना अचानक तिच्या गळ्याभोवती फास आवळला आणि तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गोमळवाडा गावावर शोककळा पसरली आहे.
















