सातारा (प्रतिनिधी) आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन इंटरनॅशनल पत्रकार संघटनेची राज्यस्तरीय बैठक काल सातारा जिल्ह्यातील दक्षिणकाशी वाई-पाचवड परिसरात कोरोना नियम आदेशांचे पालन करून पार पडली.
आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन इंटरनॅशनल पत्रकार संघटनेची राज्यस्तरीय बैठक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद वाचस्पती, महाराष्ट्र संघटक सुर्यकांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अजय मिश्रा यांच्या अध्यक्षतेत आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव आबासाहेब लक्ष्मण सुर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश महिला प्रकोष्ठच्या प्रभारी अध्यक्षा प्रा.अमिता कदम, ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे, सातारा जिल्हाध्यक्ष मुकुंदराज काकडे, सल्लागार समिती सदस्य सचिन कदम, हिंदूराव पिसाळ, पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, रायगड महिला जिल्हाध्यक्षा मंजुळा म्हात्रे आदी पदाधिकारी, पत्रकार बाधवांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील दक्षिणकाशी वाई-पाचवड परिसरात कोरोना नियम आदेशांचे पालन करून पार पडली.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष मुकुंदराज काकडे यांनी संघटनात्मक माहिती दिली भविष्यात ही संघटना अग्रस्थानी राहील असे मत मांडले. सातारा जिल्हा उपाध्यक्ष. गणेश जाधव, उस्मानाबाद जिल्ह्याध्यक्ष शिवाजी कांबळे, डॉ. मनोहर ससाणे, योगांचार्य ॲड. सुधीर ससाणे यांनी मनोगत व्यक्त केले. देश पातळीवर कार्यरत असलेल्या आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेची स्थापना राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद वाचस्पति यांनी पत्रकार हित जोपासण्यासाठी स्थापन केली आहे. या संघटनेला २१ वर्ष पूर्ण होत आहे. महाराष्ट्र राज्यात प्रदेश प्रमुख अजय मिश्रा यांच्या मार्गदर्शनात राज्य संघटक सुर्यकांत कदम, राज्य सचिव आबा सुर्यवंशी, महिला प्रकोष्ठच्या प्रभारी प्रा.अमिता कदम आणी सर्व जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, संघटक सह पदाधिकारी, पत्रकार सदस्य या संघटनेला पत्रकार जोडण्या करीत अहोरात्र परिश्रम घेत आहेत. सद्यस्थितीला सुमारे वीस ते पंचवीस राज्यात संघटनेचा विस्तार झाला असून उर्वरित जिल्ह्यात वाटचाल सुरू आहे. भविष्यात संघटनेचे २१ वे राष्ट्रीय अधिवेशन ३ ऑक्टोबार २१२१ ला सातारा जिल्ह्यात होणार आहे. संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिक यांची झालेली पहिली बैठक राज्यात व देशात संघटनेला नवीन दिशा देणारी ठरणार आहे. तसेच लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकार बांधवांच्या मागण्यांचे निवेदन दिले जाईल. राज्यात कोणत्याही पत्रकारावर विनाकारण अन्याय झाल्यास त्यांच्या पाठीशी आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन खंबीरपणे उभे राहिल, अशी ग्वाही दिली.
महिला प्रकोष्ठच्या अध्यक्षा अमिता कदम यांनी संघटनेच्या कामकाजा बाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात अजय मिश्रा यांनी संघटनेचे कार्य आणि विस्तारा बाबत आणि पत्रकारांच्या हक्कासाठी संघटन कार्य करणार असल्याचे सांगितले. कोरोना आपत्तीत जीवाची, परिवाराची चिंता न करता आरोग्यदूत म्हणून जनसेवेचे कार्य करणारे डॉक्टर व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा कोरोना वारीयर म्हणून प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. काही पदाधिकारी यांच्या राज्य व जिल्हा स्तरीय पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच सातारा जिल्हा कायदेशीर सल्लागारपदी ॲड. सुधीर ससाणे यांची नियुक्ती करण्यात आली.
सदर बैठक यशस्वी होण्यासाठी राज्य सल्लागार समितीचे सदस्य मुकुंदराज काकडे, हिंदुराव पिसाळ, सचिन घाटगे, किशोर बोराटे, विक्रम सावंत, वाई तालुकाध्यक्ष शशिकांत शिंदे, संघटक राहुल गोंजारी यांचे सहकार्य मिळाले. सुत्रसंचलन कोरेगाव तालुकाध्यक्ष संतोष धुमाळ तर आभार ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी मानले.