धरणगाव (प्रतिनिधी) येथील कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया तर्फे पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रतिमापूजन ज्येष्ठ नागरिक सुरेशचंद्र वाघ व योगेश पी.पाटील पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नंदू पाटील नगरसेवक, जंगलु चव्हाण, अशोक सैंदाणे, उमेश जाधव, बापू महाजन, रघुनंदन वाघ आदी उपस्थित होते.