पुणे (वृत्तसंस्था) अभिनेत्री कंगना रानौतनं केलेल्या वक्तव्यानंतर तिच्यावर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टिका होतेय. अशातच ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी या वकतव्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्याच सोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केलीये. मिळालेलं स्वातंत्र्य जर ‘भीक’ असेल तर सावरकरांना ‘भिक्षावीर’ म्हणायचं का?, असा ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय की, ही विधान निरर्थक असली तरीही यामागे एक राजकारण दडलेलं आहे. अशी विधाने करणाऱ्यांना राजाश्रय आहे. याशिवाय, त्यांना अशी विधाने करणं शक्य झालं नसतं. हे फॅसिस्ट राजवट आणण्याचे नियोजन आहे. अशा विधानांना आणि प्रवृत्तींना सभ्यतेचं रुप द्यायचा प्रयत्न सुरु आहे. याचा निषेध तर आहेच, मात्र नागरिकांनी याचं खरं स्वरूप ओळखून पर्यायी चळवळीच्या मागे गेलं पाहिजे.
निरंजन टकले यांनी म्हटलंय की, हा आयडिया ऑफ इंडिया बदलण्याचा प्रकार आहे. तसेच हा न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये या विचारसरणीच्या लोकांचं काहीही योगदान नाही. आणि काहीही योगदान नाही, हा जो न्यूनगंड आहे, तो झाकण्यासाठी म्हणून अशी उर्मट विधाने केली जात आहेत. हा एक प्रकारचा मानसिक आजार देखील आहे. सावरकरांना विक्रम गोखले तरी स्वातंत्र्यवीर म्हणतात ना तर मग उद्यापासून विक्रम गोखले सावरकरांना भिक्षावीर म्हणणार आहेत का? जे स्वातंत्र्य मिळाल ते जर भीक असेल तर सावरकरांना भिक्षावीर म्हणा, असं त्यांनी म्हटलंय, ही फॅसिजमची थेअरी आहे की, अशा प्रकारच्या त्यागाला आणि प्रेरणेलाच हास्यास्पद ठरवायचं आणि असं हास्यास्पद ठरणच नेहमीचं आणि सभ्य’ वनवायचं. गेली सात वर्षे सुरु असणाऱ्या या प्रकाराची आता परिसीमाच गाठण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.