TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाहतूक नियमांचं उल्लंघन न करता मिळालं चलन तर अशी करा तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) जागोजागी वाहतूक पोलिसांनी ओव्हर स्पीडिंग, रेडलाइट जंपिंग आणि स्टॉप लाईनच्या पुढे गाडी थांबवणे यासारख्या वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या लोकांची नंबरप्लेट ऑटोमॅटिक वाचून चलन तयार होते. परंतु नंबरप्लेटवर चिखल उडाल्यास वाहनाचा नंबर स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे चलन चुकीचे कापले जातात. जर चुकीचे चलन कापले गेले असेल, तर खालील पद्धतीने ते रद्द केले जाऊ शकते.

ओव्हर स्पीडिंग म्हणजेच मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणं, लाल सिग्नलला न थांबणं, तसंच सिग्नलला योग्य रेषेच्या पुढे थांबणं हे ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन आहे. असं उल्लंघन कोणत्या वाहनांकडून केलं जातंय यावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक शहरांत आता कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या संबंधित वाहनांच्या नंबरप्लेट्स कॅमेऱ्यांद्वारे आपोआपच वाचल्या जातात आणि त्या वाहनांच्या मालकांच्या नावे दंडाचं चलन जारी केलं जातं. अनेकदा असं होतं की, वाहनांच्या नंबरप्लेट्सवर चिखल उडालेला असतो किंवा नंबर चित्रविचित्र पद्धतीने लिहिलेला असतो. त्यामुळे कॅमेऱ्याद्वारे नंबरप्लेटचं रीडिंग योग्य प्रकारे होत नाही. साहजिकच दंडाचं चलन चुकीच्या नंबरवर फाडलं जातं.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

ट्रॅफिक पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता

चूक नसतानाही तुमच्या नावावर चलन फाडलं गेलं असेल, तर तुम्ही ट्रॅफिक पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता. तसंच, जवळच्या ट्रॅफिक पोलीस स्टेशनमध्ये याची माहिती देऊ शकता. या दोन्ही ठिकाणी तुमची तक्रार ऐकली गेली नाही, तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. संबंधित चलन फाडण्यात ट्रॅफिक पोलीस यंत्रणेची चूक झाली आहे हे सिद्ध करता आलं, तर दंड भरावा लागत नाही.

ट्रॅफिक पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायला हवी

स्कूटर, मोटरसायकल, कार, ट्रक अशा कोणत्याही प्रकारचं वाहन चालवत असताना कधी ना कधी चलन फाडलं जाऊ शकतं. चूक घडली असेल तर चलनावर आकारण्यात आलेला दंड भरण्याला काही पर्याय नाही. कारण वाहतूक योग्य प्रकारे चालावी यासाठी नियम केलेले असतात आणि नियमभंग केला तर दंड भरावा लागतोच; मात्र काहीही चूक नसताना चलन फाडलं गेलं तर सर्वांत आधी जवळच्या ट्रॅफिक पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्याची तक्रार करायला हवी. तिथे जाऊन चलनाची तारीख आणि वेळ नेमकेपणाने सांगून, आपली काही चूक नसल्याचं संबंधित अधिकाऱ्यांना सांगावं. त्यांनी ते मान्य केलं, तर तिथूनच तुमचं चलन रद्द होऊ शकतं.

चलन फाडलं गेलं ही बाब कोर्टात सिद्ध करणं गरजेचं

संबंधित व्यक्तीला याविरुद्ध कोर्टातही दाद मागता येते. आपण चलनाला आव्हान का दिलं आहे, आपली कोणतीही चूक नसून, गैरसमजामुळे ट्रॅफिक पोलिसांकडून चलन फाडलं गेलं आहे ही बाब कोर्टात सिद्ध करणं गरजेचं आहे. संबंधित व्यक्ती ते कोर्टात सिद्ध करू शकली, तर त्या चलनाची दंडाची रक्कम भरावी लागत नाही. ई-मेलद्वारेही याबद्दलची तक्रार ट्रॅफिक पोलिसांकडे करता येते. ट्रॅफिक पोलिसांकडून व्हेरिफिकेशन झाल्यानंतर चुकीचं चलन रद्द करता येतं. तसंच, अशा स्थितीत तक्रार कशी दाखल करायची, याबद्दल ट्रॅफिक पोलिसांकडून एक फॉरमॅटही सोशल मीडियावर शेअर केला जातो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

इकरा थीम महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतरही फाईलवरचे शेरे बदलले जातात : आशिष शेलार

December 17, 2020

जळगावात हॉटेलमध्ये तरुणाला बेदम मारहाण ; मोहाडी फाट्यावरील घटना !

September 23, 2022

महावितरणच्या 45 दिवसीय ‘कृषी ऊर्जा पर्वाची’ फलश्रृती

April 16, 2021

दररोज १६७ रूपये ‘बचत’ करा अन् ‘करोडपती’ बना !

January 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group