भुसावळ (प्रतिनिधी) आयुष्यात आनंद वाटला तरच आपल्याला आनंद मिळतो. आनंद ही अशी बाब आहे की जी वाटल्याने वाढते. त्यामुळे कायम आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन ह. भ. प. राजेंद्र गवळी महाराज यांनी आज भुसावळ येथे केले.
ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा रिंग रोड, भुसावळ येथे झाली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, प्रमुख पाहुणे ह. भ. प. दिपक महाराज, संजय चौधरी, भानुदास पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विश्व प्रार्थना आणि हनुमान चालीसा पठणाने झाली. यानंतर हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे या गजराने प्रवचनाला प्रारंभ झाला.
“आनंदाची परिभाषा” या विषयावर ह. भ. प. दिपक महाराज बोलत होते. पुढे ते म्हणाले की प्रत्येक मानवाची आनंदाची भाषा वेगवेगळी असते. कोणाला मित्र बनवण्यात आनंद वाटतो, कोणाला उत्तम स्वयंपाक करण्यात आनंद वाटतो, तर कोणाला गाणे म्हणायला, कोणाला राजकारणात, कोणाला नातवंडांसोबत खेळायला—असे विविध प्रकारचे आनंद आपल्याला घेता येतात. सुख ही शारीरिक क्षमता असून आनंद ही मानसिक अवस्था आहे.
या कार्यक्रमात रमेश चौधरी, पुंजो भारंबे, हेमंत बोंडे, प्रभाकर झांबरे, भरत जंगले, लता चौधरी, जनार्दन राणे, दिलीपसिंग चौधरी यांचे वाढदिवस असल्याने सर्वांचा उपरणे आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश बेलसरे, पुंजो भारंबे, रमण भोगे, प्रमोद बोरोले, विजया भारंबे, ज्योती चौधरी, राजाराम चौधरी, मोतीराम चौधरी, चंद्रकांत चौधरी, दिलीप चौधरी, प्रमिला चौधरी, प्रतिभा चौधरी, सोपान चर्हाटे, लोटू फिरके, अलका इंगळे, सोपान नेमाडे, अशोक नेहेते, विजया पाटील, वैशाली तुकाराम पाटील, ज्ञानदेव पाटील, अनिल पाटील, सुलोचना पाटील, प्रकाश पंडित पाटील, ज्ञानेश्वर पाटील, इंदू पाटील, विकास राणे, गणेश सरोदे, इंदुबाई सपकाळे, रजनी तळेले, यशवंत वारके, विश्वनाथ वाणी, छबुताई झांबरे, पाटील, अरुण धांडे आदी सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सतीश जंगले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश पाटील, संजय चौधरी, प्रभाकर झांबरे, अशोक नेहेते, धनराज पाटील, भास्कर खाचणे, भानुदास पाटील, सुनील सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. विश्वकल्याण साधणारी प्रार्थना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
आनंद हा नकारात्मक पण असतो — ह. भ. प. दिपक महाराज
एका व्यक्तीचा मित्र लॉटरी लागल्यामुळे तो फटाके फोडत होता. त्याला याचे कारण विचारले असता तो म्हणाला, “माझ्या मित्राला लॉटरी तिकीट लागले, पण आता ते तिकीट सापडत नाही… म्हणून मी आनंदी झालो आहे.”
















