TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हसाल तर फसाल ! उत्तर कोरियात लोकांना ११ दिवस हसण्यावर बंदी ; हुकुमशाहाचं फर्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांच्या अजब निर्णयाची चर्चा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. उत्तर कोरियात आता ११ दिवस हसण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर लोकांनी सेलिब्रेशन केलं किंवा हसताना दिसले तर त्यांच्यावर आता कडक कारवाई होणार आहे. देशाचे माजी नेते आणि सध्याचा हुकुमशाह किम जोंग उनचे वडील किम जोंग-इल यांच्या १० व्या पुण्यतिथिच्या निमित्ताने सरकारने लोकांच्या हसण्यावर बंदी घातली आहे.

माजी नेते किम जोंग इल यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर कोरियात शोक पाळण्यात येत आहे. त्यामुळे जनतेवर ११ दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. या काळात देशातील जनता हसू शकत नाही, खूश होऊ शकत नाही आणि दारूही पिऊ शकत नाही. किम जोंग इल यांच्या निधनाच्या स्मरणार्थ लोकांनी कोणत्याही प्रकारचा आनंद व्यक्त करू नये, असे सक्त आदेश सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. किम जोंग इल यांनी १९९४ ते २०११ पर्यंत उत्तर कोरियावर राज्य केले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. किम जोंग इल यांच्या निधनानंतर त्यांचा धाकटा मुलगा किम जोंग उन याने देशाची सूत्रे हाती घेतली.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

किम जोंग इल यांचा मृत्यू १७ डिसेंबर रोजी झाला होता. वयाच्या ६९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांनी १७ वर्षे देशावर राज्य केले. हा शोक दरवर्षी उत्तर कोरियामध्ये १० दिवसांचा असतो. मात्र यावेळी त्यांच्या निधनाला १० वर्षे पूर्ण झाल्याने ११ दिवसांचा केला आहे. त्यामुळे या दिवशी कुणीही बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी जाऊ शकत नाही. जर नियमांचं उल्लंघन केल्यास वैचारिक गुन्हेगार म्हणून अटक करण्यात येणार आहे. इतकंच काय तर, कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला तरी, त्यांना मोठ्याने रडण्याची परवानगी नाही आणि ते शोक संपल्यानंतरच मृतदेह बाहेर काढू शकतात.

रेडिओ फ्री एशियाशी बोलताना सिनुइजू शहरातील रहिवासी म्हणाले की, शोक काळात आम्ही दारू पिऊ शकत नाही, हसू शकत नाही किंवा इतर आनंद साजरा करू शकत नाही. नैऋत्य प्रांतातील दक्षिण ह्वांगहेमधील सूत्रांनी सांगितलं की, पोलिसांना लोकांवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. या दिवसात दु:खी दिसत नसलेल्या व्यक्तीला पोलीस अटक करू शकतात. हा ११ दिवसांचा कालावधी पोलीस अधिकाऱ्यांसाठीही त्रासदायक आहे. जर कोणी हुकुमाचे उल्लंघन करताना आढळले तर त्यांना उत्तर देणे कठीण होते. या भीतीमुळे अधिकारी डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

खळबळजनक : पेपरफुटी प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंना अटक ; टीईटी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धान्यसाठ्यात तफावत : गैरव्यवहार सिद्ध होवूनही कारवाई का नाही ? ; जनसंग्रामचा सवाल

December 26, 2021

मंदिरावर झेंडा चढविताना विजेचा जोरदार धक्का ; तीन भाविक ठार, दोघे बचावले !

August 31, 2023

वासराला वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

September 10, 2020

कोविड सेंटर कथित गैरव्यवहार प्रकरण : ईडीच्या हाती लागले 150 कोटींच्या मालमत्तेचे कागदपत्रे !

June 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group