धरणगाव (प्रतिनिधी) येथील शहीद कॉन्स्टेबल अनिलसिंह बयस चौकात ‘पोलीस स्मृतीदिनानिमित्त’ स्व. अनिलसिंह बयस यांच्या प्रतिमेला पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी चीनच्या सैनिकांसोबत लढतांना भारतीय राखीव दलाचे १० कॉन्स्टेबल शहीद झाले होते. या वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हा दिवस ‘पोलीस स्मृती दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आज धरणगाव शहरातील शहीद कॉन्स्टेबल अनिलसिंह बयस चौकात पोलीस स्मृती दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम स्व. अनिलसिंह बयस यांच्या प्रतिमेला पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण केली. कार्यक्रम प्रसंगी विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त करतांना पोलीस स्मृती दिनाचे महत्व सांगून स्व. अनिलसिंह बयस यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी स्व. अनिलसिंह बयस यांचे बंधू प्रल्हादसिंह बयस यांना अश्रू अनावर झाले. कार्यक्रम प्रसंगी वर्षभरात शहीद झालेल्या पोलीस दलातील सर्व वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी धरणगावचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके साहेब, पीएसआय अमोल गुंजाळ साहेब, बालाजी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डी. आर. पाटील, स्व. अनिलसिंह बयस यांचे बंधू प्रल्हादसिंह बयस, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शामसिंह चव्हाण, घनश्यामसिंह बयस, विजयसिंह जनकवार, विनोद संदानशिव, प्रदीप पवार, वैभव बाविस्कर, पराग चव्हाण, कुलदीप चंदेल, निलेश बयस, विशाल चौधरी, पवन महाले, प्रशांत वाणी, दाऊसिंह गयवार, लक्ष्मण पाटील, यश राजपूत, प्रेम पचेरवार यांच्यासह डेलची परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन धरणगाव पोलीस स्टेशन यांच्या सूचनेनुसार दाऊसिंह गयवार यांच्या मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले असून त्यांना डेलची परिसरातील सर्व युवक मित्रांचे अनमोल सहकार्य लाभले.