भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील ८६ वर्षीय सेवानिवृत्त विद्युत कंपनी कर्मचारी सुखदेव चौधरी यांना सायबर भामट्यांनी भिती दाखवून तब्बल ८० लाख ५ हजार ४१६ रुपये फसवले, अशी धक्कादायक माहितीसमोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.
माहितीनुसार की, २७ऑक्टोबर रोजी चौधरी यांना अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाचे अधिकारी म्हणून ओळख दिली. काही वेळाने त्याच व्यक्तीने चौधरी यांना व्हिडिओ कॉल करून सांगितले की मुंबई कुलाबा पोलिस ठाण्यातून पोलिस अधिकारी विजय त्रिपाठी बोलत आहेत आणि चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या मोबाईलचा गैरवापर करून इतरांची फसवणूक होत असल्याची धमकी दिली.
यानंतर, आणखी एका भामट्याने संजय पिसे म्हणून चौधरी यांच्याशी संपर्क साधून कॅनरा बँकेत उघडलेले खाते आतंकवादी संघटनांकडून वापरले जात असल्याचे दाखवणारे दस्तऐवज पाठवले. भामट्यांनी भारतीय रिझर्व बँकेचा सही असलेले पत्रही पाठवून, चौधरी यांना गुन्ह्यात अट होईल, त्यामुळे पैसे रिझर्व्ह बँकेच्या खात्यात जमा करा असे सांगून तब्बल ८० लाख रुपये घेऊन घेतले. फसवणुकीचा कालावधी २८ ऑक्टोबर ते ५ डिसेंबर २०२५ असा होता. चौधरी यांनी पैसे पाठवल्यानंतर भामट्यांचे संपर्क बंद झाले आणि पैसे परत न मिळाल्याने त्यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.















