वडीगोद्री (वृत्तसंस्था) आम्ही सुरुवातीपासूनच आमच्या व्याख्येप्रमाणे सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करतोय, मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या, शिंदे समितीचे नोंदी शोधण्याचे काम पुन्हा सुरू करा आदी मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत त्यांनी सोमवारी मध्यरात्री १२ किंवा १ वाजता अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या वेळी जरांगे-पाटील म्हणाले की, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही, आमचा सगळा समाज हा मराठा आणि कुणबी एकच आहे. बाकीच्या विषयावर बोलायचं नाही. माझ्या समाजाला जो देईल, समाज त्याचा फायदा करत असतो. आपण आंदोलनासाठी कुणाची वाट बघत नाही. छगन भुजबळसारखे आंदोलन चालवत नसल्याचे सांगून जरांगे यांनी समाजाला राजकारणात जायचं नाही; परंतु आमच्या मागण्या मान्य कराव्यात, नाहीतर नंतर बोलायचं नाही. आमचं मुख्य ध्येय आरक्षण मिळवणे हे असल्याचे आम्ही सरकारला स्पष्टपणे सांगतो, नंतर काही बोललो तर राजकीय भाषा वापरल्याचे सांगू नका, असे सांगून जरांगे यांनी सरकारने जर आरक्षण दिले नाही, तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा इशारा दिला.