धरणगाव (प्रतिनिधी) येथील बाजार समितीत उद्या राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या गुरुवारी (दि.९) रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव बाजार समिती येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अजितदादा पवार गटाचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, युवक विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जितदादा पवार गटाच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी केलं आहे.