मुंबई (वृत्तसंस्था) मशिदींवरील भोंग्यांच्या मनसे अध्यक्ष विरोधात राज ठाकरेंनी भूमिका घेतल्याने वातावरण चांगलेच तापले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे.
राज ठाकरे आज भोंग्याच्या मुद्द्यावर पक्षाची आगामी काळातील भूमिका जाहीर करणार आहेत. या पार्श्वभूमीर राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. निवडक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर राज ठाकरे भोंग्यांबाबतचे पक्षाचे धोरण जाहीर करणार आहेत. भोंगे काढण्याबाबत राज ठाकरे यांनी 4 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदीवरील भोंगे बंद नाही झाले तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावावी, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निवडक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर राज ठाकरे भोंग्यांबाबतचे पक्षाचे धोरण आज जाहीर करण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे .तर 75,000 मनसैनिकांना नोटीस बजावण्यात आली आहे .