इस्लामाबाद (प्रतिनिधी) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Pakistani Prime Minister Imran Khan) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या अफवा पाकिस्तानात परसवल्या जात आहेत. या चर्चेनंतर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून इम्रान खान यांचे निवासस्थान असलेल्या इस्लामाबाद येथील बनी गाला या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
इस्लामाबाद पोलिसांनी ट्विट केलं की, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांचे बनी गाला येथे संभाव्य आगमन लक्षात घेता, परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत इस्लामाबाद पोलिसांना इम्रान खान यांच्या टीमकडूनन परतल्याची कोणतीही पुष्टीचं वृत्त मिळालेलं नाही. इस्लामाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा विभागाने बनी गाला येथे विशेष सुरक्षा तैनात केली आहे. तसंच बनी गालामधील लोकांची यादी अद्याप पोलिसांना उपलब्ध झालेली नाही. इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू आहे आणि जिल्हा दंडाधिकार्यांच्या आदेशानुसार कोणत्याही सभांना परवानगी नाही.
इम्रान खानला पूर्ण सुरक्षा देणार – पोलीस
पोलिसांनी पुढे सांगितले की, इस्लामाबाद पोलीस कायद्यानुसार इम्रान खानला संपूर्ण सुरक्षा पुरवतील आणि इम्रान खानच्या सुरक्षा पथकांकडूनही परस्पर सहकार्य अपेक्षित आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या प्रमुखाला काही झाले तर ते पाकिस्तानवरील हल्ला मानले जाईल, असे इम्रान खान यांचे पुतणे हसन नियाझी यांनी सांगितले. ते म्हणाले की, या घटनेकडे पाकिस्तानवर हल्ला म्हणून पाहिले जाईल आणि प्रतिक्रिया आक्रमक असेल, ज्यांनी केलं त्यांना पश्चात्ताप होईल.