असोदा (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. संस्थाध्यक्ष विलास चौधरी अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
ज्येष्ठ शिक्षिका उषा नेमाडे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. रुचिता सूर्यवंशी, तृप्ती बिऱ्हाडे, दिशांत सूर्यवंशी, पूनम चौधरी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल, एस. डी. कचरे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील काही प्रसंगविषयी माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते संजय बिऱ्हाडे , ज्येष्ठ शिक्षक एल. जे. पाटील , डी. जी . महाजन व सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभांगिनी महाजन यांनी केले. आभार मंगला नारखेडे यांनी मानले.