भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वे प्रशासनाने मंगळवारी रेल्वेतील फुकट्या प्रवाशांसह अनधिकृत विक्रेत्यांविरोधात मंगळवारी भुसावळ रेल्वे विभागात धडक मोहिम राबवल्याने खळबळ उडाली.. 551 केसेसच्या माध्यमातून सुमारे तीन लाखांचा दंड यावेळी वसुल करण्यात आला.
धडक मोहिमेमुळे उडाली खळबळ
भुसावळ विभागाने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मंगळवारी डीआरएम ईती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम राबवण्यात आली. व्यापक मोहीम पार पाडण्यासाठी वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचार्यांची एक समर्पित टीम तयार करण्यात आली. मंगळवार, 14 मे रोजी भुसावळ, खंडवा, बडनेरा, अकोला, मनमाड, नाशिक रोड स्टेशनवर अनधिकृत फेरीवाले (विक्रेते) यांच्याविरोधात मोहिम राबवली. या मोहिमेमध्ये 35 आरपीएफ अधिकारी आणि कर्मचारी व 52 वाणिज्य विभागाचे कर्मचारी (वाणिज्य निरीक्षक आणि टीटीई) या कारवाईत सहभागी झाले.
32 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली तर 457 विना तिकीट प्रवास करणार्या प्रवाशांवर केसेस करण्यात आल्या तर रेल्वे स्थानक परिसरात अस्वच्छता करणार्या 49 जणांवर कारवाई करण्यात आली तसेच धुम्रपान करणार्या दहा जणांवर व रेल्वे रूळ ओलांडणार्या तीन जणांवर कारवाई करण्यात आली. एकूण 551 केसेसच्या माध्यमातून तीन लाख 99 हजार 663 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.