बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील येवती येथील शेतकरी विनोद दत्तात्रय शिंदे गट क्रमांक २६०/२/२/ब शिवार येवती यांच्या शेत जमिनीतील कुंपनलिकेची दोनशे फूट लांबीची साधारण ३४ हजार रुपये किंमतीची केबल लंपास केली. शनिवारी मध्यरात्री शेतात कोणी नसल्याने चोरट्यांनी संधी साधली आहे.
विनोद शिंदे हे सकाळची वीज पुरवठा असल्याकारणाने शेतात पाणी देण्यासाठी मोटर पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना आपली वायर चोरीस गेल्याचा प्रकार लक्षात आला. व त्यांनी आसपास शोध घेतला असता आणखी काही शेतकऱ्यांची मोटर शेतकऱ्यांचेही शेतातील केबल चोरीस गेल्याची समजले. चोरट्यांनी शेतांकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाळून या केबल मधील तांबे काढले असल्याचे आढळले.
रामदास श्रावणे, सुधाकर माळी,राजु शिंदे,दत्तु धनगर,भागवत दांडगे,कृष्णा वाघ,उमेश वाघ,शिवाजी वाघ,मनोहर पाटील,बाळु पाटील,सतिष बावस्कर,शुभम पाटील,योगेश कांदेले, अशोक ठाकुर,तुळशीराम वानखेडे,भिमराव पाटील, आणि आणखी काही शेतकऱ्यांची केबल चोरीस गेली आहे. या शेतकऱ्यांचे एक लाख पंधरा हजाराचे नुकसान या चोरीमुळे झाले आहे. तालुक्यात सध्या शेतातील विजपंपांच्या केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. एक महिन्यापूर्वी सुद्धा येवती शिवारात १४ शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरी गेल्या होत्या. या प्रकरणी विनोद शिंदे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.