चाळीसगाव (प्रतिनिधी) रस्त्यात गाडी अडवून एकाला मारहाण करत त्याच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी जबरीने तोडून नेली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात अधिक असे की, सुधाकर नारायण राठोड (वय ४५, रा. हनुमान वाडी चाळीसगाव) हे दि,१८ डिसेंबर रोजी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास आपली चार चाकी महेंद्रा थार कंपनीची काळया रंगाची क्रमांक (MH-१५-HY-७३२७) हीने शहरातून दुध सागर मार्गाने जात होते. सुर्यादय अपारमेन्टच्या बाजुला असलेल्या वापरत्या रस्त्यावर शेखर गवळी उर्फ गंग्या (रा.चाळीसगाव) आणि त्याच्यासोबतच्या ३ अनोळखी इसमांनी गाडी अडवली. त्यानंतर सुधाकर राठोड यांच्या डोळयावर गंग्याने फटका मारुन त्यांच्या गळ्यातील ५ तोळे वजनाची सोन्याची चैन जबरीने तोडून नेली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना त्याब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहेत.
















