धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमीत्त युवती सभेच्या वतीने वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.डी.वळवी हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र बँक धरणगावचे उपशाखा अधिकारी हर्षल पाटील, उपप्राचार्य एस.एस.पालखे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी युवती सभा चेअरमन प्रा.डॉ.ज्योती महाजन यांनी प्रास्ताविक सादर करतांना सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती सांगून या दिवसाचे महत्त्व पटवून दिले.सर्व प्राध्यापकांचा विद्यार्थीनींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी सूत्रसंचालन डॉ.सुषमा तायडे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एस.एम.खरे,EMBRO संपादक डॉ. डी.आर.बोंडे, NSS कार्यक्रम अधिकारी डॉ.ए.ए.जोशी, डॉ. संजय शिंगाणे, डाॅ डी.के. गायकवाड , प्रो. राजु केंद्रे , डाॅ वारडे, डाॅ.बोरसे, डाॅ कांचन महाजन,डाॅ गौरव महाजन ,प्रो डी बी चव्हाण, प्रा.प्राची पगारिया,प्रा.पूर्वा कुलकर्णी, प्रा.सुलताना पटेल, प्रा. श्रद्धा चौटे आणि सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्यने विद्यार्थी उपस्थित होते.