धरणगाव (प्रतिनिधी) शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थाला उडवून दुचाकीस्वाराने पळ काढल्याची घटना दि.२ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी मुलगा माजी नगरसेवक हाजी इब्राहीम शेख यांचा आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि २ रोजी संध्यासाळी ४.५० वाजेचा सुमारास मुहम्मद आमीर शेख ईब्राहिम (वय १३ वर्षे रा. पातालनगरी धरणगाव) हा मित्रासोबत शाळेतून घरी पायी परत येत होता. यावेळी तन्मय ईन्टरप्राईसेस व फर्निचर दुकानासमोर मरिमाता मंदिराजवळ येथे पाठीमागून येणाऱ्या एक काळ्या रंगाची प्लॅटिना कंपणीची मोटार साईकल वरिल अज्ञात चालकाने त्याचा ताब्यातील दुचाकीने मुलगा मुहम्मद आमीर याला जोरदार धडक दिली. यामुळे मुहम्मद यला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी हाजी इब्राहीम शेख यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सा.फौ रामदास पावरा हे करीत आहेत. दरम्यान, जखमी मुलावर जळगावला खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.