गोंदिया (वृत्तसंस्था) ‘खून का बदला खून’ म्हणत ३० वर्षांपूर्वी वडिलाचा खून करणाऱ्या व्यक्तीचा रहस्यमयरित्या खून केला. त्यानंतर हा खून अपघात असल्याचे भासविला. परंतू सीसीटीव्ही फुटेजने सगळ्या गोष्टींचा भांडाफोड केला. सुनील धनिराम भोंगाडे (४४, रा. शास्त्री वॉर्ड, गोंदिया) व शाहरूख हमीद शेख (२४, रा. कुऱ्हाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर मोरेश्वर खोब्रागडे (रा. चंद्रशेखर वॉर्ड, गोंदिया) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
खून करून भासवला अपघात !
२९ नोव्हेंबरला साडेसहा वाजताच्या सुमारास फुलचूरटोला ते पिंडकेपार मार्गावर दुचाकीचा अपघात होऊन मोरेश्वरचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळासह शेजारच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या पाहणीदरम्यान हा अपघात नसून खून असल्याचे दिसून आले. याप्रकरणात पोलिसांनी कलमवाढ करून वरिष्ठांच्या निर्देशानुसार तपास सुरू केला. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक तयार करण्यात आले होते. आरोपींचा शोध व तपासादरम्यान मोरेश्वरने काही वर्षापूर्वी यातील सुनील भोंगाडे याच्या वडिलाचा खून केला. होता. तो आठ दिवसांपासून मृत मोरेश्वरचा पाठलाग करीत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणात पोलिसांनी १०० ते १५० च्यावर सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. यावरून व तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुनील भोंगाडे व शाहरुख शेख यांना अटक केली.
अशी केला खून !
आरोपी हे काही दिवसांपासून मोरेश्वरच्या मागावर होते. 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मोरेश्वर दुचाकीने येत असताना पिंडकेपार मार्गावरील अनिल कबाडी यांच्या गोदामाजवळ मोरेश्वरला आरोपींनी अडविले. यात त्यांच्यात वाद झाला. वादानंतर हातापायी झाली. दरम्याने आरोपींचा रोग विकोपाला जात मोरेश्वरवरच्या डोक्यावर लोखंडी रॉडने पाचसहा वार केले. तो जमिनीवर पडल्यानंतर सुनील व शाहरुखने लाथाबुक्याने डोके व पोटावर मारहाण केली. मोरेश्वर मेल्याची खात्री करून दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.
वडिलांच्या खुनाचा बदला घेतला !
पोलिसांनी सुनीलची विचारपूस केली असता, मोरेश्वरने भावासह मिळून ३० वर्षांपूर्वी जमिनीच्या वादातून त्याच्या वडिलांचा धारदार शस्त्राने खून केला होता. तसेच एक वर्षापासून मोरेश्वर हा सामाजिक कार्यक्रमात सुनीलला पाहून काटा काढण्याचे संकेत देत होता. वडिलांच्या हत्येचा राग मनात ठेवून मोरेश्वरची हत्या केल्याचे सांगितले. या प्रकरणात त्याला साथ देणारा शाहरूख शेख यालाही पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींविरोधात गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.
जमिनीच्या वादातून केला होता खून !
मृत मोरेश्वर खोब्रागडे याने आपल्या भावासोबत मिळून जमिनीच्या वादातून सुनील भोंगाडे यांच्या वडिलाचा मनोहर चौक गोंदिया येथे धारदार शस्त्राने वार करून खून केला होता असे सुनील भोंगाडे याने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले. मृत एका वर्षापासून कोणत्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये सुनील भोंगाडे यांना पाहून नेहमी हिणवण्याचे उद्देशाने हसत होता. याचाही राग सुनीलला होता.