जळगाव (प्रतिनिधी) येथील नेरी नाकाकडून एक वृद्ध सायकलने घरी जात असताना जवळच ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली.
यासंदर्भात अधिक असे की, शहरातील कासमवाडी परिसरात राहणारे सुरेश देविदास सोमवंशी (वय ६०) हे शिलाई मशीन रिपेअरचे काम करतात. मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ते सायकलने जात असताना नेरी नाका ते कासमवाडी रस्त्यावर मनपाच्या कचरा संकलन करणारे ट्रॅक्टर क्रमांक एमएच.१९.एपी. ७३३० च्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भावाची पत्नी आणि २ मुली असा परिवार आहे.