जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पिंप्राळा येथे राहणाऱ्या गोपाल प्रभूलाल राठी (वय ६३) या व्यापाऱ्याला दिलेल्या पैशांच्या ५ ते ६ पट रक्कम वाढवून परत देण्याचे अमिष दाखावत पुतणीचा पती व त्याचा भाऊ यांनी तब्बल ४८ लाख ५६ हजार रुपयात गंडविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी जावायाला पैसे मागितले असता, त्यांना जीवेठार मरण्याची धमकी दिली. याप्रकरणी बुधवार दि. ११ नोव्हेंबर रोजी संशयित विजय जगदशि मंडोरे व त्यांचा भाऊ लक्ष्मीनारायण जगदिश मंडोरे (रा. निसर्ग कॉलनी, पिंप्राळा) यांच्याविरु फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील प्रभूपुष्प आनंद मंगल सोसायटीतील गोपाल प्रभुलाल राठी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. राठी यांची एमआयडीसीमध्ये कंपनी होती, ते त्यांनी सन २०१८-१९ मध्ये विकली होती. त्यासाठी त्यांना ८८ लाख रुपये मिळाले होते. गोपाल राठी यांच्याकडे पैसे असल्याची माहिती पुतणी वर्षा विजय मंडोरे, जवाई विजय जगदीश मंडोरे आणि जवाईचा भाऊ लक्ष्मीनारायण मंडोरे यांच्याकडे होती. दरम्यान पुतणी वर्षा आणि जावई विजय मंडोरे यांनी सन २०१६ मध्ये सव्वा दोन लाख रुपये उसनवारीने घेतले होते. ते त्यांनी सहा महिन्यांनी परत केले होते. त्यानंतर पुतणी वर्षा मंडोरे आणि जवाई विजय मंडोरे यांनी राठी यांना सांगितले की, तुम्ही आम्हाला पैसे दिले तर दिलेल्या पैशांच्या रकमेच्या पैशांची मागणी केली असता त्यांना हुलकावून लावले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गोपाल राठी यांनी अखेर बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित जवाई विजय जगदीश मंडोरे आणि त्याचा भाऊ लक्ष्मीनारायण जगदीश मंडोरे (दोघ रा. निसर्ग कॉलनी, पिंप्राळा) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय मंडोरे यांनी राठी यांना तुमचे पैसे कुठे जाणार नाही, हा घरचा विषय आहे, आम्ही बाहेरच्या लोकांना लाखो रुपये कमवून देतो, तुम्ही तर माझ्या पत्नीचे काका आहात, तुमच्याकडे असेही काही पैसे बँकेत पडून आहे, एका वर्षात तुम्हाला ५० लाखांचे कमीत कमी ३ कोटी रुपये कमवून देऊ, असे सांगत काही रक्कम कॅश आणि काही रक्कम बँकेतून देण्याचे सांगितले. दरम्यान याच्यावर विश्वास ठेवून राठी यांनी वेळोवेळी त्यांना ऑनलाईन, आरटीजीएस आणि चेक स्वरूपात तब्बल ४८ लाख ५६ हजार रुपये विजय मंडोरे आणि लक्ष्मीनारायण मंडळी यांना दिले.